30 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरमहाराष्ट्रयेळेवाडी ते टाकेवाडी रस्त्यासाठी एक कोटी दहा लाखांचा निधी : प्रशांत विरकर

येळेवाडी ते टाकेवाडी रस्त्यासाठी एक कोटी दहा लाखांचा निधी : प्रशांत विरकर

माण तालुक्यातील सतोबा देवस्थान, टाकेवाडी ते येळेवाडी (विरकर वस्ती) या रस्त्याच्या टप्प्याच्या सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी पत्रकाद्वारे दिली. (Prashant Virkar said One crore ten lakh rupees sanctioned for Yelewadi to Takewadi road)

पांगरी येथील बिरोबा मंदिर ते सतोबा देवस्थान टाकेवाडी या रस्त्याचे काम आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील अनेक वर्षांपूर्वी झाले होते. तांत्रिक कारणामुळे येळेवाडी (विरकर वस्ती) ते टाकेवाडीच्या दरम्यानचा एक किलोमीटर अंतराचा एक टप्पा डांबरीकरणापासून वंचित राहिला होता. अनेक वर्षांपासूनची मागणी असून देखील याचे काम होत नव्हते. यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता.
तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडेही उर्वरित टप्प्यासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते.
हे सुद्धा वाचा
महाराणी येसूबाईंच्या समाधीचा शोध लावणाऱ्या सुहास राजे शिर्केंचे इतिहासकारांनी केले कौतुक !

INDvAUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा एका क्लिकवर

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडाचे रिलेशन उघड? वाचा अभिनेत्रीने केलेली खास पोस्ट

आमच्या या प्रयत्नांना यश आले असून सतोबा देवस्थान टाकेवाडी फाटा ते विरकर वस्ती येळेवाडी या रस्त्याच्या टप्प्याच्या सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापुढेही बिजवडी व परिसरातील कामांसाठी पाठपुरावा करून विविध कामे मार्गी लावून घेणार असल्याचेही विरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी