26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रनिर्भयाच्या खून्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भयाच्या खून्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

लयभारी टीम

नवी दिल्ली : दिल्ली निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील खून्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्माची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर, विनयने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. मात्र ही याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींची फाशी टळली आहे. दिल्ली कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र शुक्रवारी दिल्ली कोर्टाने यासंदर्भातला निर्णय दिला आहे.

१ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासंबंधीचे डेथ वॉरंट काढण्यात आले होते. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केले होते. मात्र फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्या वतीने इरफान अहमद पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले.

हे आहे निर्भया प्रकरण…

दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, खून करण्यात आला होता. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या घटनेला सात वर्षाचा कालावधी लोटला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी