30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रपीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार, रस्ते खचणाऱ्या ठिकाणीही बोगस काम

पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार, रस्ते खचणाऱ्या ठिकाणीही बोगस काम

सय्यद सादिक : टीम लय भारी
सातारा : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाबळेश्वर परिसरातील रस्ता वाहून गेला. दरडही कोसळली. तिथे ५ जणांचे बळी गेले. याच रस्त्यावर ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’ने बोगस काम केल्याचे समोर आले आहे (PWD’s bogus work at Mahabaleshwar – Vita road ) .

याबाबत पुणे विभागाचे मुख्य अभियंता रा. आ. मोरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत मोरे यांनी साताऱ्याचे अधिक्षक अभियंता स. गो. मुनगिलवार यांच्याकडून चौकशी अहवाल मागविला आहे ( PWD chief engineer summoned to Superintendent Engineer ).

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्ट पासून मिळणार उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा

शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

महाबळेश्वर ते विटा असे रस्त्याचे काम चालू आहे. केळघर घाटात रेंगडेवाडी येथील रस्ता नाजूक स्थितीत आहे. सन २०१५ मध्ये भुवैज्ञानिकांनी एक अहवाल दिला होता. त्यानुसार रेंगडीवाडी येथील या घाटात भुस्खलन होण्याचा अंदाज वर्तविला होता. पण या इशाऱ्याकडे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केले ( PWD ignored to experts report ).

मुळातच पीडब्ल्यूडी आणि भ्रष्टाचार यांचे अतूट नाते आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि कंत्राटदार यांची मिलीभगत असते. जास्तीत जास्त बोगस कामे करायची, आणि स्वतःचे खिसे भरायचे असा कारभार पीडब्ल्यूडीकडून राबविला जातो ( PWD’s corrupt practices ).

महादेव जानकर दिल्लीच्या वाटेवर, डॉ. महात्मेंच्या जागेवर वर्णी लागणार

PWD
पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार, रस्ते खचणाऱ्या ठिकाणीही बोगस काम

PWD cuts 25 more trees overnight near Bapu Kuti

महाबळेश्वरमधील या रस्त्यावर सुद्धा असाच प्रकार झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. जिथे भुस्खलन होऊ शकते, त्या ठिकाणी गनेटींग व रॉक बोल्टींग करणे गरजेचे होते. पण रस्त्याच्या आराखड्यात त्याची काळजीच घेतली गेली नाही.

फक्त डांबर ओतून रस्ता तयार केल्याची तक्रार मोरे यांच्याकडे प्राप्त झाली आहे. ‘रोड वे सोल्यूशन इंडीया कंपनी’ या ठेकेदाराने प्रस्तुत थातूरमातूर काम केले आहे. हे तकलादू काम सामान्य जनतेचा बळी घेईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारीनंतर मुख्य अभियंता यांनी चौकशी अहवाल मागविला आहे. परंतु केवळ कागदी घोडे नाचवू नयेत. जबाबदार अभियंते व कंत्राटदार यांच्यावर ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक जनतेकडून करण्यात येत आहे ( PWD must take action against Engineers and Contractor ).

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी