28 C
Mumbai
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात दोन दिवस पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा ; माॅन्सूनचा श्रीलंकेत मुक्काम

राज्यात दोन दिवस पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा ; माॅन्सूनचा श्रीलंकेत मुक्काम

माॅन्सूनने काल श्रीलंकेपर्यंत मजल मारली होती. मात्र आज माॅन्सूनने आहे त्याच भागात मुक्काम केला. पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून पुढचा प्रवास करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यात पुढील दोन दिवस उष्णता आणि पाऊस राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला. माॅन्सूनने काल दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली होती. पण माॅन्सून आज याच भागात होता.

माॅन्सूनने ( Monsoon) काल श्रीलंकेपर्यंत मजल मारली होती. मात्र आज माॅन्सूनने ( Monsoon) आहे त्याच भागात मुक्काम केला. पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून ( Monsoon) पुढचा प्रवास करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यात पुढील दोन दिवस उष्णता आणि पाऊस (Rain and heat) राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला. माॅन्सूनने ( Monsoon) काल दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली होती. पण माॅन्सून आज याच भागात होता.(Rain and heat wave warning in the state for two days Monsoon to stay in Sri Lanka)

माॅन्सूनमध्ये ( Monsoon) काल प्रगती झाली नाही. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेचा आणखी काही भाग, अंदामान आणि निकोबारचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र, श्रीलंकेचा आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

देशातील अनेक भागात उष्णतेची लाट

दुसरीकडे देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे. काल देशातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सिअस तापमान राजस्थानमधील बारमेरमध्ये नोंदले गेले. देशातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. हवामान विभागाने पुढील ३ दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर आणि नाशिक, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

आज पुणे, नगर, नाशिक,जळगाव, धुळ आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी