32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रशिर्डीच्या साई संस्थानाकडून भाविकांसाठी नियमावली जाहीर

शिर्डीच्या साई संस्थानाकडून भाविकांसाठी नियमावली जाहीर

टीम लय भारी

शिर्डी : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राज्यातील सर्व धर्माची प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट पूर्णतः संपले नसल्यामुळे कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज (५ ऑक्टोबर २०२१) शिर्डी साई संस्थानाने नवी नियमावली जाहीर केली आहे (Sai Sansthan of Shirdi announces rules for devotees).

शासनाच्या नियमानुसार शिर्डीचे साईमंदिर येत्या ७ तारखेपासून भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. भाविकांना आता दर्शनासाठी हार-प्रसाद घेऊन जात येणार नाही. साई संस्थानाने पत्रकार परिषद घेऊन ही नियमावली जाहीर केली आहे.

वंचितांना मदत करून वाढदिवस साजरा, भाजप पदाधिकाऱ्याचे कौतुकास्पद कार्य

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

या नियमावलीनुसार दररोज फक्त १५,००० भाविक साईमंदिरात प्रवेश घेतील. याचाच अर्थ दर तासाला जवळपास ११५० भाविक दर्शन घेतील. तसेच साईबाबांच्या काकड आरतीसाठी फक्त ९० भक्तांना मंदिरात परवानगी देण्यात येणार आहे. यात १० गावकऱ्यांचा आणि ८० भाविकांचा समावेश असणार आहे. १० वर्षाखालील मुलांना, ६५ वर्षावरील नागरिकांना आणि गरोदर महिलांना साई मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

Navratri festival 2021 : गृहविभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Maharashtra registers lowest Covid infections in 8 months on Monday

शिर्डीच्या साई संस्थानाकडून भाविकांसाठी नियमावली जाहीर

शिर्डी साई संस्थानाची नियमावली

1) दररोज फक्त १५ हजार भाविकांनाच दर्शन

2) हार-प्रसाद घेऊन जाता येणार नाही

3) १० वर्षांखालील मुलांना, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि गरोदर महिलांना प्रवेश नाही

4) आरतीसाठी फक्त १० गावकऱ्यांना प्रवेश

5) पत्रकार परिषदेत शिर्डी साई संस्थानाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थानाचं भक्तनिवास आणि प्रसादालय देखील भाविकांसाठी सुरु होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी