31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रसंगमनेरमध्ये हिंदूंच्या मोर्चानंतर दोन गटात दगडफेक

संगमनेरमध्ये हिंदूंच्या मोर्चानंतर दोन गटात दगडफेक

हिंदूंवरील वाढत्या अन्यायाविरोधात, लव्ह जिहाद विरोधात आज हिंदू संघटनांनी संगमनेरमध्ये भगवा मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा पार पडल्यानंतर मोर्चेकरी परतत असताना समनापूर येथे दोन गटामध्ये दगडफेक झाल्याने या मोर्चाला गालबोट लागले आहे. या दगडफेकीमध्ये एक जण जखमी, तर काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

संगमनेरमध्ये हिंदू संघटनांकडून काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर दोन गटात समनापूर येथे दगडफेक झाल्यानंतर मोठा तणाव निर्मान झाला आहे. गावात सध्या तणावपू्र्ण शांतता असून घटनेचे गांभिर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दगडफेकीच्या या घटनेनंतर समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या समनापूरमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणतीही वाईट घटना घडू नये यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सुचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाबाबत काय म्हणाले संभाजीराजे..

आयफोन वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, ऍपल iOS 17 नव्या अपडेटसह येणार बाजारात !

लग्नानंतर तीन महिन्यातच स्वरा भास्करने दिली गुड न्युज

लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटनांविरोधात हिंदू समाजाने भगवा मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर दगडफेक झाल्यानंतर आता या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून समाजकंटकांवर कारवाईची मागणी होत असून दगडफेकीच्या घटनेचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घटनेला चिथावणी देणारे गावातील नसून काही बाहेरच्या लोकांनी चिथावणी दिल्याचे देखील काही नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी