31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनलग्नानंतर तीन महिन्यातच स्वरा भास्करने दिली गुड न्युज

लग्नानंतर तीन महिन्यातच स्वरा भास्करने दिली गुड न्युज

बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत असते. सध्या देखील ती तिच्या प्रेगन्सीच्या बातम्यांवरून चर्चेत आली आहे. गेले काही दिवस ती प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरू होत्या. पण आता स्वत: स्वरा भास्कर हीने या गोष्टीला दुजोरा दिला. तिने स्वत: सोशल मिडीयावर तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये तीने लिहीले की, ‘ऑक्टोबरमध्ये ते त्यांच्या बाळाचे स्वागत करतील आणि यासाठी ते खूप आनंदी आणि उत्सुक आहेत.’ स्वराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने तिच्या पती फहाद अहमदसोबत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पिंक कलरचा गाऊन घातला आहे. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

सोशल मिडीयावर पोस्ट करताच अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने तीन महिन्यांपूर्वीच समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज करुन सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यानंतर तिने मार्च दिल्ली मध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत फहाद अहमदसोबत लग्न करून मेहंदी, संगीत, रिसेप्शन असे फोटो शेअर केले होते. त्यांच्या लग्नात राहूल गांधी, शशी थरूर, अरविंद केजरीवाल अशा अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

हे सुद्धा वाचा

कौतुकास्पद ! आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये परिणाचा ज्युनियर गटात पाचव्या क्रमांकावर झेप

राज्यात तलाठी भरती जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा

उडिसा रेल्वे अपघातानंतर रुळावर सापडली उत्कट प्रेम कवितांची वही

2019 मध्ये स्वरा आणि फहाद एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. स्वरा भास्कर हीने ‘तनु वेड्स मनु’, ‘निल बटे सन्नाटा’,’वीरे दी वेडींग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी