31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाबाबत काय म्हणाले संभाजीराजे..

शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाबाबत काय म्हणाले संभाजीराजे..

२ जूनला तिथिनुसार शिवराज्याभिषेक पार पडल्यानंतर आज तारखेप्रमाणे रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष आहे. या सोहळ्याला रायगडावर अनेक शिवभक्तांनी उपस्थिती लावली. हा सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. यावेळी सर्वांमध्ये उत्सुकाचे आणि जल्लोशाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी अनेक नेत्यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती दाखवली.

यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सोहळ्याला उपस्थित असलेल्या शिवभक्तांना संबोधित करून म्हणाले, ‘आपण शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. ते धर्मांध नव्हते, आदिलशाही होती. दुसऱ्यांच्या धर्मावर अत्याच्यार करुन ते धर्म पुढे घेऊन जात होते. पण शिवाजी महाराजांनी तसे केलं नाही शिवाजी महाराज आपली परंपरा रूढी जपायचे म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना दुसऱ्यांच्या धर्मावर कधीच अत्याचार कधीच केला नाही. पण आपल्या धर्मावर कोणी चालून आलं तर त्याची गय सुद्धा केली नाही. म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका ही स्वराज्यासाठी पोषक होती.’ असं वक्तव्य त्यांनी केलं

हे सुद्धा वाचा

आयफोन वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, ऍपल iOS 17 नव्या अपडेटसह येणार बाजारात !

लग्नानंतर तीन महिन्यातच स्वरा भास्करने दिली गुड न्युज

कौतुकास्पद ! आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये परिणाचा ज्युनियर गटात पाचव्या क्रमांकावर झेप

तसचं पुढे त्यांनी सरकारला आवाहन केलं यावेळी ते म्हणाले, ‘वीस वर्ष सरकारला सांगून मी दमलो. आपले जीवन स्मारक जर कुठे असतील तर ते आपले गडकिल्ले आहेत . गडकिल्ले आपले स्मारक आहेत. ज्याच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास आहे. तुम्ही प्रतापगडाचे प्राधिकरण केले ठिक आहे, पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या 350 किल्ल्यांवर चर्चा कधी करणार असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी