29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान केंद्रावर सावलीसाठी शेड उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा: नाना पटोले.

मतदान केंद्रावर सावलीसाठी शेड उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा: नाना पटोले.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ तारखेला पार पडला असून मतांची टक्केवारी समाधानकारक दिसत नाही. जनतेमध्ये मतदान करण्याचा उत्साह आहे परंतु राज्यात सगळीकडे ४० अंशांपेक्षा जास्त तपमान असल्याने मतदानासाठी घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक आहे. बहुतांश मतदान केंद्रात सोयीसुविधा नाहीत, मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या आवारात तात्पुरते शेड बांधावे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात की, राज्यात ४० अंशांच्या वर उन्हाचा पारा असल्याने या कडक उन्हात मतदान करणे नागरिकांना त्रासदायक होत आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ तारखेला पार पडला असून मतांची टक्केवारी समाधानकारक दिसत नाही. जनतेमध्ये मतदान करण्याचा उत्साह आहे परंतु राज्यात सगळीकडे ४० अंशांपेक्षा जास्त तपमान असल्याने मतदानासाठी घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक आहे. बहुतांश मतदान केंद्रात सोयीसुविधा नाहीत, मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या आवारात तात्पुरते शेड बांधावे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी केली आहे.यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात की, राज्यात ४० अंशांच्या वर उन्हाचा पारा असल्याने या कडक उन्हात मतदान करणे नागरिकांना त्रासदायक होत आहे. (Set up shade sheds at polling booths and arrange drinking water: Nana Patole)

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या उन्हाचा जास्त त्रास होतो. कडक उन्हामुळे उष्माघातासारखा जीवघेणा प्रकार ओढवू शकतो. मतदानासाठी तासंतास रांगा लावाव्या लागतात, कडक उन्हात मतदानासाठी रांगा लावणे हे सुद्धा त्रासदायक आहे. नागरिकांचा या कडक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी निवडणुक आयोगाने सुविधा पुरवल्या पाहिजेत. उन्हापासून बचाव करण्याची सोय उपलब्ध झाली तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होईल, असेही पटोले म्हणाले.

यावर्षीचा उन्हाळा आतापर्यतचा जगभरातील सर्वाधिक उष्ण उन्हाळा असेल असा इशारा तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे. अशा परिस्थितीत याच कालावधीत देशात लोकसभा निवडणुका होणार असून त्याचा निकालदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे. या परिस्थितीत देशातील लोकसभा निवडणुकांसमोर उष्णतेची लाट आणि हवामान बदलाचं आव्हान निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. भारतीय हवामान विभागानं देखील या कालावधीत सरासरी तापमान अधिक राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं निवडणूक काळात उष्णतेच्या लाटेबद्दल धोक्याचा इशारा का दिला आहे? भारतीय हवामान विभागानं 2024 मध्येदेखील एप्रिल ते जून या कालावधीत खूप जास्त उष्णता असेल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागानुसार भारतात एप्रिल ते जून या कालावधीत असणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा यंदा अधिक तापमान असणार आहे. त्याचबरोबर देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. दक्षिण, मध्य आणि पूर्व भागात आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात याचा फटका विशेषकरून बसणार आहे.त्याचबरोबर देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. दक्षिण, मध्य आणि पूर्व भागात आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात याचा फटका विशेषकरून बसणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी