29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रविशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे हिट अँण्ड रन प्रकरणी विशाल अग्रवाल सह आणखी सहा जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती, पण कोर्टाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली. या दुर्धटनेत दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. कोर्टाने आता विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुणे हिट अँण्ड रन प्रकरणी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) सह आणखी सहा जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (14-day judicial custody) सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालची (Vishal Agarwal) पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती, पण कोर्टाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (14-day judicial custody) सुनावली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली. या दुर्धटनेत दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. कोर्टाने आता विशाल अग्रवालला (Vishal Agarwal) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (14-day judicial custody) सुनावली आहे.(Vishal Agarwal sent to 14-day judicial custody )

या प्रकरणातील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) सोबतच सर्व सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे हायकोर्टात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात. या प्रकरणात विशाल अग्रवाल हे आज किंवा उद्या जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास पुण्यातील कल्याणी नगर परिसरात हा अपघात घडला. भरधाव सुपरकारने एका बाईकला जोरदार धडक दिली. मद्यधुंद अवस्थेत सुपरकार चालकाने एका बाईकला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की, बाईकवरील तरुण आणि तरुणी हे हवेत उडून दूरवर पडले. या अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी