28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeमहाराष्ट्रजालना लाठीचार्जप्रकरणी भाजपाने माफी मागावी: सुप्रिया सुळे

जालना लाठीचार्जप्रकरणी भाजपाने माफी मागावी: सुप्रिया सुळे

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसेसची जाळपोळ करण्यात आली. आज शरद पवारही जालना दौऱ्यावर गेले आहेत. आंदोलनातल्या जखमींची ते विचारपूस करणार आहेत. या सगळ्या घडामोडी होत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी जालना लाठीचार्ज प्रकरणात भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजपा याला काय उत्तर देते हे पहावे लागणार आहे.

जालन्यातील घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात पंढरपूर, सोलापूर, शिर्डी, बीडच्या माजलगावमध्ये उमटले. येथे आंदोलन करणाऱ्यांनी पोलिसांवर आणि दुकानावर दगडफेक केली. जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी गुरासारखे मारहाण केली. राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद उमटले असून आज ठिकठिकाणी आंदोलनं आणि बंदची हाक देण्यात आली आहे.

विरोधक सरकारवर संतापले

या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शांतपणे आंदोलन करणाऱ्या वेचून वेचून मारण्याची ही कोणती मर्दुमकी आहे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. सबका साथ, सबका विकास… अशा भूलथापा देऊन हे केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारच्या काळात सिलेंडरचे दर १२०० रुपयात मिळत आहे. असे असताना फक्त २०० रूपये सिलेंडर चे कमी करून हे सरकार जनतेला फसवत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.

जालना येथे अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना, अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

गृहविभागाचे अपयश

जालना येथे झालेल्या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्यात यावी, यातील सर्व दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणात सर्व गृहविभागाचे अपयश असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हे ही वाचा 

राज ठाकरेंनी मराठा आंदोनलावरुन राज्याच्या कारभाऱ्यांना सुनावले; म्हणाले….

शरद पवार मराठा आंदोलकांना भेटणार!

पोलिसांचा मुर्खपणा, शिंदे – फडणवीस यांना डोकेदुखी!

गृह विभागाच्या आदेशाशिवाय लाठीमार अशक्य : रोहित पवार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जालन्यातील 8 तारखेच्या नियोजित कार्यक्रमाला अडचण येईल म्हणून हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान गृह विभागाच्या आदेशाशिवाय हा लाठीमार होत नसतो म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजता समन्वयक मनोज जरांगे यांच्या कुटुंबाशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा देखील केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी