32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयमुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुल कोसळण्यावरून मनसे आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुल कोसळण्यावरून मनसे आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळून येथे बहादुर शेख नाक्याजवळ काही महिन्यांपासून पुलाचे काम सुरु आहे. आतापर्यंत ४६ पिलर्सचे काम झाले आहे. याच पिलर्सवर गर्डर बसवताना (१६ ऑक्टोबर) या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुलाचा काही भाग कोसळला होता. तर काही भाग हा दुपारी २.४५ वाजता पडल्याने आसपासचे वातावरण भयभीत झाले होते. १.८१ किमी’चा हा प्रोजेक्ट असून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालु होते. यावेळी स्थानिक आमदार शेखर निकम हे घटनास्थळी होते. या घडलेल्या घटनेवरून आता राजकीय पक्ष मान वर काढत आहेत. मनसेचे कार्यकर्ते अविनाश जाधव यांनी यावर सरकारला धारेवर धरले आहे.

मुंबई-गोवा महामार्गालगत चिपळूण येथील बहादुर शेख नाक्याजवळ पुलाचे बांधकाम सुरू असून पुलाचा काही भाग कोसळला होता. मात्र कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची सकारात्मक बाब आता समोर आली आहे. हा पुल वाशीष्ठी नदीसमोर असून अनेक मुंबईचे चाकरमाणी सणाला याच ठिकाणाहून प्रवास करत असतात. मात्र पुल कोसळल्याने हा महामार्ग बंद झाल्याने प्रवाशांना समस्या होऊ लागली. या झालेल्या दुर्घटनेवर आता मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव सरकारवर बरसले आहेत.

 

हेही वाचा

‘आम्हाला संपवुन टाकाल का?’ फडणविसांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचा सवाल

राहुल गांधीच भावी पंतप्रधान, बावनकुळेंसमोर तरूणाने दिले उत्तर

‘लागिरं झालं जी’मधली आज्याच्या मामीने सांगितला आयुष्यातील बिकट प्रसंग

काय म्हणाले अविनाश जाधव?

कोकणातील पुल दुर्घटनेबाबत आता मनसे आक्रमक झाली आहे. १४० कोटींचा पुल अचानक पडतो. याचे नेमके कारण काय आहे. ही खुप मोठी दुर्घटना असून त्याची बातमी होते. यावर पुन्हा कोणी बोलत नाही. यामागे चुकी कोणाची आहे? गव्हर्मेंटची आहे की कॉंट्रॅक्टरची आहे? आम्हाला कळालं तर पाहिजे की १४० करोडचं पुढे काय झाले? जर हे असेच चालु राहीले तर पुढील ५० वर्षे कोकणाचा विकास होणार नाही. म्हणून राज साहेबांनी आम्हाला येथे पाठवले आहे. येथे घडलेली परिस्थीती आम्ही सांगू आणि त्यानंतर राजसाहेब पुढील निर्णय घेतील.

महामार्गाला गडकरींचे नाव देणार

अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम सुरु आहे, तरीही काम पुर्ण होत नाही. गडकीरी सांगतात की १ लाख कोटी २ लाख काेटीचे रस्ते बनवले असून सक्सेस तुम्ही घेता ना मग अपयश कुणी घ्यायचे, १८ वर्षांपासून काम चालू आहे. एवढेच नाही तर येताना वाशीष्ठी नदीच्या पुलाच्या सळया बाहेर निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गडकरींचे नाव पुलाला देण्याबाबत वक्तव्य केले होते. आम्ही मागणीच करणार आहोत या महामार्गाला गडकरींचे नाव द्या. कारण हा रस्ता त्यांच्याच खात्यात तयार झाला आहे. अशी खोचक टिका करत आविनाश जाधव एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलत होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी