26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeक्राईमघरकाम करणाऱ्या महिलेनं भाडेकरूंना 3 कोटी रुपयांना फसवलं.

घरकाम करणाऱ्या महिलेनं भाडेकरूंना 3 कोटी रुपयांना फसवलं.

एसआरए मध्ये भाडेकरूंना तीन कोटी रुपयांना फसवणाऱ्या छाया खरात या दलाल महिलेस अटक करण्यात आली आहे.दादर पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. छाया हिने अनेक गिरणी कामगारां ही फसवले आहे.ती पूर्वी घरकाम करायची.

सेंच्युरी बाजार , प्रभादेवी भागात एसआरए च काम सुरू होत.या ठिकाणी एका वसाहतीत 14 इमारती बांधण्यात आल्या आणि त्यात 1750 फ्लॅट आहेत. मोठ्या संख्येने प्लॅट उपलब्ध झाले.यावेळी अनेक घर मालकांनी आपलं प्लॅट भाड्याने द्यायला सुरुवात केली.यावेळी छाया खरात ही सक्रिय झाली.ती पूर्वी घरकाम करायची.पण जस फ्लॅट उपलब्ध झालेत.लोक फ्लॅट जस फ्लॅट भाड्याने देऊ लागले तसं छाया हिने आपला व्यवसाय बदलला.ती दलाली करू लागली.मात्र , यावेळी तिने फ्लॅट मालक आणि भाडेकरू या दोघांना फसवायला सुरुवात केली.

अमित जाधव हे मिल कामगार आहेत.त्यांचा मुलगा किशोर याला लोवर परेल भागात चांगली नोकरी मिळाल्याने तो त्याच भागात भाड्याने घर शोधत होता.यावेळी त्याची ओळख छाया यांच्या सोबत झाली.छाया यांनी किशोर यांना एक घर दाखवलं.हे 15 लाख डिपॉझिट आणि शून्य भाडं अस असल्याचं तिने सांगितलं.किशोर ते मान्य होत.त्याने 15 लाख रुपये दिले आणि फ्लॅट मध्ये रहायला सुरुवात केली.मात्र , दोन महिन्यां नंतर फ्लॅटचे मालक आले आणि ते किशोर यांच्याकडे दोन महिन्यांच भाडं मागू लागले.या प्रकाराने किशोर चक्रावले.त्यांनी छाया यांना फोन करण्याचा प्रयत्न केला.पण तिचा फोन बंद होता. यावेळी आपली फसवणूक झाल्याचं किशोर यांच्या लक्षात आलं.

हे सुद्धा वाचा

आखाजी गाणी : खान्देशातील अक्षय्य तृतीया खास करणारी अहिराणी गीते

शरद पवारांची घणाघाती टीका; गुजरात दंगलीतील आरोपींना निर्दोष सोडणे ही संविधानाची हत्या

मराठा आरक्षणप्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल

त्यांनी तात्काळ दादर पोलीस स्टेशन गाठलं.यावेळी छाया ही अशाच प्रकारची फसवणूक करत असल्याचं उघडकीस आलं. छाया हिने आता पर्यंत दोन वर्षात 48 जनांची सुमारे 3 कोटी रुपयांना फसवणूक केली असल्याचं उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं.याबाबत आता छाया विरोधात दादर पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात छाया हिला अटक करण्यात आली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी