30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांची घणाघाती टीका; गुजरात दंगलीतील आरोपींना निर्दोष सोडणे ही संविधानाची हत्या

शरद पवारांची घणाघाती टीका; गुजरात दंगलीतील आरोपींना निर्दोष सोडणे ही संविधानाची हत्या

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुजरातमधील नरोदा पाटिया दंगलीप्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयानंतर जोरदार घणाघाती टीका करत, या दंगलीतील 67 आरोपींना निर्दोष सोडणे म्हणजे कायद्याचे राज्य आणि संविधानाची हत्या असल्याचे म्हटले आहे. विरोधकांना संपवून भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. सन 2002 साली गुजरातमध्ये धार्मिक दंगल उसळली होती. या दंगलीत नरोदा पाटिया येथील 11 मुस्लिमांच्या हत्येप्रकरणी गुजरात मधील एका न्यायालयाने गुरुवारी 67 आरोपींची निर्दोष मुक्तता केली.


खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी

मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बोलताना शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी खारघर येथे उष्माघाताने मृत्यू झालेल्या दुर्घटनेला पवार यांनी राज्य सरकार निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले असून या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात; महाराष्ट्र सरकार क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सोचा गुन्हा नोंदवल्याने उच्च न्यायालयाकडून अंतरीम जामीन

अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सोचा गुन्हा नोंदवल्याने उच्च न्यायालयाकडून अंतरीम जामीन

पुलवामा हल्ल्यातील सत्य बाहेर आले नाही  

शरद पवार यांनी या मेळाव्यात केंद्रातील भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले देशात कट्टरतावाद वाढत असून आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत याविरोधात लढावे लागेल. शुक्रवारी जम्मू काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यालावरुन पवार यांनी केंद्र सरकारवर टका केली. पवार म्हणाले, पुलवामा हल्ल्याची कोणती चौकशी नाही केली. इतकेच नव्हे तर आजपर्यंत या हल्याचे सत्य बाहेर आले नसल्याचे देखील ते म्हणाले. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा घणाघात पवार यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी