29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमंत्रालयमराठा आरक्षणप्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल

मराठा आरक्षणप्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल

मराठा आरक्षण टिकून राहण्यासाठी राज्यसरकारने जून २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील न्या. एम. आर. शहा, न्या. संजीव खन्ना, न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या घटनापीठाने ही पुनर्विचार याचिका गुरुवारी फेटाळून लावली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यसरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या हातात सत्ता येऊ द्या, दोन दिवसांत मराठा आरक्षण देतो, म्हणणारे कुठे आहेत? सरकारला ९ महिने झाले, मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षण टिकून राहण्यासाठी राज्यसरकारने जून २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील न्या. एम. आर. शहा, न्या. संजीव खन्ना, न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या घटनापीठाने ही पुनर्विचार याचिका गुरुवारी फेटाळून लावली. १९९२ च्या निर्णयानुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुनर्विचार याचिका फेटाळल्याप्रकरणी शिंदे – फडणवीस सरकारला जबाबदार धरले. या मुद्यावर सरकारने विधी व न्याय खात्यातील अधिकारी, राज्याचे महाअधिवक्ता, कायदा क्षेत्रातील तज्ञ मंडळी आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षणाबाबतची पुढची भूमिका ठरविण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

हे सुध्दा वाचा :

मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात; महाराष्ट्र सरकार क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

राज ठाकरे हे भाजपने पाळून ठेवलेले पोपट : संजय राऊत

मराठा आरक्षण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका!

आमच्या हातात सत्ता येऊ द्या दोन दिवसांत मराठा व धनगर समाजाला आरक्षण देऊ, अशा बाता देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. गेली ९ महिने त्यांच्याकडे सत्ता आहे, आता आरक्षणाचे काय झाले? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. आमच्या हातून सत्ता हिसकावून घेणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्विचार याचिकेकडे लक्ष दिले नसल्याची टीका राऊत यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी