28 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे व कुटुंबियांनी घेतली 'कोविड लस'

उद्धव ठाकरे व कुटुंबियांनी घेतली ‘कोविड लस’

टीम लय भारी

मुंबई :-  देशभरात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस टोचून घेणाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. परंतु आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील जे.जे. हाँस्पिटलमध्ये जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधक संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थितीत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री असे तीनजणांना लस देण्यात आली आहे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविशिल्ड लस घेतली आहे.

दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. त्याअंतर्गत १ मार्च रोजी सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एम्स रूग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुढाकर घेऊन मुंबईत जे.जे. रूग्णालयात कोरोना लस घेतली होती. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील मुंबईतील जे.जे. रूग्णालयात कोरोना लस घेतली होती.

जेष्ठ नागरिकांनाच लस

दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरूवाती झाली आहे. तर, ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि रक्तदाब किंवा इतर आजार असलेल्या रूग्णांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशभरात २५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी, ६.४४ लाख नागरिकांना सोमवारीच लस देण्यात आली आहे.

कोविन ऍपवर नोंदणी नाही, वेबसाईवरच नोंदणी

कोरोना लसीकरणासाठी पहिल्याच दिवशी कोविन ऍपवर नोंदणीसाठी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने ऍपवरील नोंदणी बंद केली असून वेबसाईटवरच लसीकरणाची नोंदणी करावी, असे आवाहन जनतेला केले. http://cowin.gov.in या साईटवर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी