31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयशिंदेंची शेवटची फडफड, फडणवीस राजकारणातील कच्चे मडके : संजय राऊत

शिंदेंची शेवटची फडफड, फडणवीस राजकारणातील कच्चे मडके : संजय राऊत

महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत. एकनाथ शिंदे धावपळ करतायत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये रविवारी केली. शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी टेम्पो भरुन पैसे आणून दिले तरी काही होत नाही. मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत. एकनाथ शिंदे ( eknath shinde) धावपळ करतायत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी नाशिकमध्ये रविवारी केली. शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी टेम्पो भरुन पैसे आणून दिले तरी काही होत नाही. मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत.(Shinde’s last flutter, Fadnavis a raw man in politics: Sanjay Raut )

महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत. शिंदे धावपळ करतायत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे, असा खोचक टोला संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी लगावला आहे.

नाशिक मनपा हद्दीतील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा देत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर विचारले असता संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, नाशिकच्या घोटाळ्याबाबत 14 तारखेला सविस्तर बोलणार आहे. नाशिकमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री, नगरविकास खाते आणि स्थानिक नेते या घोटाळ्यात सहभागी होते. ही लहान गोष्ट नाही. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली पैसे मिळाले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जनतेच्या पैशाची लुट कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टी लावून बसणार असतील तर त्यांना दाखवावे लागेल की तुम्ही खोटारडे आहात. कुठे आहे ईडी आणि सीबीआय हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. 800 कोटींचा घोटाळा होतो ही काही लहान गोष्ट नाहि असे संजय राऊत म्हणाले.

गोमास कंपनीकडून मोदींनी पैसे घेतले, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी केला. यावर ते म्हणाले की, हा आरोप मी आज करत नाही आहे. बँकेतील निवडणूक रोख्यातील जी माहिती आली आहे त्यातून मोदींना पैसे मिळाले आहेत. बिफ एक्सपोर्टच्या माध्यमातून भाजपला त्यातून 550 कोटी मिळाले आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. ही मुलाखत काळू बाळूचा तमाशा असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावर संजय राऊत म्हणाले की, काळू बाळूचा तमाशा फार गाजला होता. काळू बाळूचा तमाशा एक सांस्कृतिक तमाशा होता. बावनकुळेंनी त्याचा अपमान केलाय. बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील संस्कृतीशी संबंध राहिलेला नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी