31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयवंचित आघाडी सोबत निवडणुकीत धाव घेण्यास काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी

वंचित आघाडी सोबत निवडणुकीत धाव घेण्यास काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी

टीम लय भारी

मुंबई: अवघ्या काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका येऊन राहिल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आता तयार आहे. या संदर्भात बोलणी करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांच्यावर सोपवली आहे.(Congress should clarify its role in running in the elections along)

४ फेब्रुवारी रोजी प्रियदर्शी तेलंग हे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी यांना भेटले. आगामी महानगर पालिका निवडणुकीत आघाडी करण्या संदर्भात तिवारी यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. गोपाल तिवारी यांनीही काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले.

मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे आघाडीचा प्रस्ताव नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले आणि प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्यात काहीतरी कम्युनिकेशन गॅप असावी असे थोडक्यात दिसून आले.नाना पटोले यांनी वंचित ने दिलेल्या युतीच्या प्रस्तावा बाबत काँग्रेसची भूमिका येणाऱ्या महानगर पालिकेची निवडणुक काय असेल हे मात्र स्पष्ट करावी.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा

शिवाजी पार्कवर लतादीदींचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं, काँग्रेसची मागणी

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

IUML to contest at least 20 NMC seats, ties up with Vanchit Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी