30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे अपघात प्रकरणातील दोषींना सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांचे पुणेकरांना वचन

पुणे अपघात प्रकरणातील दोषींना सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांचे पुणेकरांना वचन

पुणे सांस्कृतिक, शैक्षणिक नगरी आहे.देशातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना पुणे शहर सुरक्षित शहर वाटते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक व्हावे, असे अनेकांना वाटते. पण आता पुणे असुरक्षित वाटायला लागले आहे.पुण्यातील कार अपघात प्रकरणी आमचे आमदार धंगेकर पुढे आले, त्यांनी प्रकरण लावून धरले. या अपघात प्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्यावर कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षनेता आणि नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे, पुणेकरांना असा विश्वास देत, 'या अपघात प्रकरणी न्यायिक चौकशीची आम्ही मागणी केली असून दोषींना सोडणार नाही, असे वचन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

पुणे सांस्कृतिक, शैक्षणिक नगरी आहे.देशातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना पुणे शहर सुरक्षित शहर वाटते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक व्हावे, असे अनेकांना वाटते. पण आता पुणे असुरक्षित वाटायला लागले आहे.पुण्यातील कार अपघात प्रकरणी ( Pune accident case) आमचे आमदार धंगेकर पुढे आले, त्यांनी प्रकरण लावून धरले. या अपघात ( Pune accident case) प्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्यावर कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षनेता आणि नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे, पुणेकरांना असा विश्वास देत, ‘या अपघात ( Pune accident case) प्रकरणी न्यायिक चौकशीची आम्ही मागणी केली असून दोषींना सोडणार नाही, असे वचन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी दिले आहे.(We will not spare the culprits in the Pune accident case; Vijay Wadettiwar’s promise to Puneites)

“दोन निष्पाप जीव गेले आहेत. याचे दुःख मोठे आहे. आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे. एकाला बदलून उपयोग काय? सगळ्यांना लुटण्याचे काम या सरकारने केलेले आहे. एकाला बाजूला करून काहीही होणार नाही. आता महायुती बाजूला केली पाहिजे,” अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. पुणे बचाव समिती आयोजित ‘असुरक्षित पुणे कोणामुळे’ हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की, “स्वतःला राजकारणी म्हणून घ्यायला लाज वाटते, अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे. आधी जो आदर होता आता तो राहिला नाही. कारण सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला. पुणे कार अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता. यावर आक्षेप घेत आमचे आमदार धंगेकर यांनी वस्तुस्थिती मांडली. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना वाचवणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे. आरोपी श्रीमंत असून त्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. या घटेनमागे राजकीय दबाव असून त्याचे पुरावे आहेत.” असे म्हणत त्यांनी ( Vijay Wadettiwar) टीका केली.

“घटना घडते आणि पोलिस सुस्त होते. गुन्ह्याची नोंद नीट होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात. सगळं प्रकरण अनेक संशय निर्माण करणारे आहेत. यामध्ये डॉक्टर, पोलिसदेखील दोषी आहेत. पल्लवी सापळे भ्रष्टाचाराच्या सापळ्यात आहेत. त्यांना साफसफाई करायला पाठवले असून घटना घडेपर्यंत कारवाई होत नाही. कोणाचा फोन होता? कोणी फोन केला? त्याला सहआरोपी केले पाहिजे. चौकशी करायला येता आणि बिर्याणी मागवता. ही चौकशी आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच, “या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती. पोलिस आयुक्त आल्यावर त्यांनी गुंडांची परेड केली. फक्त दिखावा केला.” असा गंभीर आरोप त्यांनी केला. ते पुढे ( Vijay Wadettiwar) म्हणाले की, “पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडला. पुणे पोलिस आयुक्तालयमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. तीन महिने नंबर नसलेली गाडी पुणे रस्त्यावर फिरत होती. तरीदेखील कारवाई होत नाही. कारण इथल्या पोलीस आयुक्तांचा वचक नाही. सरकारमध्ये बदल्यांचा भ्रष्टाचार आहे. २०२३ मध्ये डॉ. तावरे यांची बदली करावी, असा अहवाल होता. तरी तावरे बदली झाली नाही. किडनी, ड्रग प्रकरणात त्यांचे नाव आले आहे. तरी बदली केली नाही. त्यांनी ससून रुग्णालयाची संपूर्णपणे वाट लावली,” असेही आरोप त्यांनी ( Vijay Wadettiwar) यावेळी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी