32 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमंत्रालयदिवाळी नंतर आता गौरी-गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा, राज्य सरकारचा निर्णय

दिवाळी नंतर आता गौरी-गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा, राज्य सरकारचा निर्णय

दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे.

गणरायाचे आगमन एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. गौरी -गणपतीला फराळाचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमधे 100 रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे. फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलंय. सरकारने वेळेवर शिधा संच एकत्रीतपणे उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी सरकारने अचानक दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचे घोषित केले होते. पण या शिधाच्या वाटप आणि वितरणात बऱ्याच घोळ झाल्याने अनेकांना दिवाळीत शिधा काही मिळू शकला नव्हता. त्यामुळे सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. पण यंदा गौरी-गणपतीला हा शिधा गरीबातील गरीबा पर्यंत पोहचवण्याचे सरकारने ठरवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी