35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयमंत्रालय कॅन्टीनमधील जेवणात सापडले झुरळ

मंत्रालय कॅन्टीनमधील जेवणात सापडले झुरळ

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या महामारीमध्ये मंत्रालयातील अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन हा भोजनासाठीचा पर्याय उरला आहे ( Cockroach in food at Mantralaya’s canteen ). पण कॅन्टीनमधील भोजन धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

मंत्रालयाच्या या कॅन्टीनमधील भोजन करण्यासाठी गेलेल्या काहीजणांना जेवणातच चक्क झूरळ सापडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, एका मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच भोजन करताना हे झूरळ सापडले. या कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी डाळभात घेतला होता. त्यातील एका कर्मचाऱ्यात ताटात हे झूरळ आढळून आले.

मंत्रालय कॅन्टीनमधील जेवणात सापडले झुरळ

कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी ते जेवण परत घेतले, व दुसरे जेवण देण्याची तयार दर्शविली. परंतु जेवणातील झुरळ बघून पुन्हा जेवण करण्याची इच्छाच राहिली नाही, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. बुधवारी हा प्रकार घडला. मंत्रालयाच्या नव्या इमारतीमधील पोटमाळ्यावर असलेल्या कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

‘आदित्य ठाकरेंना खून करावासा वाटला तर, पहिल्यांदा नारायण राणेंचा करतील’

धनंजय मुंडे पाच तास अडकले ‘ट्राफिक’मध्ये, पावसाचा फटका

IAS प्रवीण परदेशींची संयुक्त राष्ट्रांत नियुक्ती, केंद्राकडून मंजूरी

पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्याला आणि कन्येला कोरोना

‘कोरोना’मुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुटुंबे गावी आहेत. मंत्रालय परिसरातील बहुतांश रेस्टॉरण्ट्स सुद्धा बंद आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीनमध्येच बहुतांश अधिकारी व कर्मचारी जेवण करतात.

अशा परिस्थितीत कॅन्टीन व्यवस्थापनाने भोजन तयार करताना अशी निष्काळजी दाखवायला नको, अशी भावना या कर्मचाऱ्याने ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

Mahavikas Aghadi

दुपारी झुरळामुळे, तर रात्री पावसात अडकल्याने घडला उपवास

झुरळ सापडल्याचा हा प्रकार काल दुपारी घडला. त्यामुळे जेवण न घेताच मंत्री कार्यालयातील हे कर्मचारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरी निघाले. पण अतिमुसळदार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रात्री 12 वाजल्या तरी हे कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसोबत ‘फ्रि वे’वर अडकून पडले होते. दुपारी झुरळामुळे जेवण झाले नाही, तर रात्री पावसामुळे मिळाले नाही. सलग आठ – दहा तास पोटात काहीच नसल्याने या कर्मचाऱ्यांची दयणीय स्थिती झाली होती.

हे आवर्जुन वाचा : धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी