28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजBreaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला...

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’मुळे राज्यातील करोडो विद्यार्थ्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे ( Uddhav Thackeray and Ajit Pawar taken decision for students ).

महाराष्ट्र सरकार व गुगल यांच्यात एक करार करण्यात आला आहे ( Government of Maharashtra and Google will provide education to students ). त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा फायदा तब्बल 2.3 कोटी विद्यार्थ्यांना होणार आहे.

हे आवर्जुन वाचाधनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

Mahavikas Aghadi

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. याबाबत गुगलने एक पत्रक जारी केले आहे. गुगलच्या वतीने जी सूट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरूम, गूगल मीट यांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविले जाईल.

काय आहे हा उपक्रम ?

या उपक्रमाअंतर्गत खासगी, सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित अशा सगळ्या शाळांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना या उपक्रमाअंतर्गत एक आयडी देईल. मिळालेल्या आयडीच्या आधारे शिक्षक व विद्यार्थी अध्यापन व अध्ययन करतील.

हे सुद्धा वाचा

युवा सेनेने ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षणमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला!

डॉ. आंबेडकरांच्या शिक्षण संस्थांसाठी १२० कोटींची गरज;  उद्धव ठाकरे, अजितदादांकडे मंत्री संजय बनसोडेंची मागणी

‘आदित्य ठाकरेंना खून करावासा वाटला तर, पहिल्यांदा नारायण राणेंचा करतील’

धनंजय मुंडे पाच तास अडकले ‘ट्राफिक’मध्ये, पावसाचा फटका

अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी सुनावले

विद्यार्थी व शिक्षकांसाठी ही सॉफ्टवेअर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध केली जाणार आहेत. त्याचा वापरही अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने करता येईल, असे गुगलने पत्रकात नमूद केले आहे.

देशातील पहिले राज्य : उद्धव ठाकरे

‘कोरोना’च्या जागतिक संकटामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षण पुन्हा कसे सुरू करायचे याची आपल्यासमोर चिंता आहे. ‘उद्या करायचे, ते आज करा’ या उक्तीनुसार आपण ऑनलाईन शिक्षण सुरू करीत आहोत. त्यानुसार ‘जी सूट फॉर एज्युकेशन’ आणि ‘गुगल क्लासरूम’ हे उपक्रम राज्य सरकारने सुरू केले आहेत. गुगलच्या सहकार्य असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र सरकार हे पहिलेच राज्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

अजितदादांनी गुगलचे केले कौतुक

या उपक्रमामुळे विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात. प्रश्न विचारू शकतात. व्याख्याने ऐकू शकतात. शंकांचे निरसन करून घेऊ शकतात. या उपक्रमाबद्दल मी गुगलचे कौतुक करतो. कारण या कठीण काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करण्यास आम्हाला यश मिळणार आहे, असे अजितदादा पवार म्हणाले.

शिक्षक व विद्यार्थ्यांना फायदा – गुगल

गुगलचे भारतातील कंट्री हेड व उपाध्यक्ष संजय गुप्ता ( Sanjay Gupta, country head, google ) यांनी या उपक्रमाचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, महामारीमुळे शाळा बंद झाल्या आहेत. भारतातील ३२ कोटी पेक्षा जास्त मुलांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे कठीण झाले आहे.

मात्र आम्ही तंत्रज्ञानाच्या जोरावर विद्यार्थी व शिक्षकांना उत्तम शिक्षण देऊ शकतो. या उपक्रमाचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आमच्यासोबत केलेला करार हा महत्वपूर्ण आहे, असे गुप्ता म्हणाले Google will provide education in Maharashtra.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी