32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमंत्रालयधनंजय मुंडे पाच तास अडकले ‘ट्राफिक’मध्ये, पावसाचा फटका

धनंजय मुंडे पाच तास अडकले ‘ट्राफिक’मध्ये, पावसाचा फटका

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळदार पावसाचा फटका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बसला चांगलाच बसला. पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुक कोंडीमध्ये मुंडे पाच तास अडकले ( Dhananjay Munde stuck in the traffic).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची सांयकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी मुंडे बीडवरून सकाळी 9 वाजता निघाले. 5 वाजता ते मस्जिद बंदर येथे पोहोचले. तिथून अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर यशवंतराव चव्हाण सेंटर आहे. पण वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी भवनमध्ये पोहोचण्यासाठी तीन तास लागले. तोपर्यंत बैठकही संपली होती.

हे सुद्धा वाचा

IAS प्रवीण परदेशींची संयुक्त राष्ट्रांत नियुक्ती, केंद्राकडून मंजूरी

धनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेतले; मुंडेंची मात्र पंचाईत

धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयासाठी 13 कोटी देणार

धनंजय मुंडेंना पीएने दिली अनोखी भेट

मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मंत्रालय व सीएसटी परिसरातही कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस कोसळला आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

प्रवास करणाऱ्या सगळ्यांचीच वाहने खोळंबून पडली आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला, आणि ते पाच तास गाडीमध्येच अडकले. पाच तासानंतर शेवटी ते बंगल्यावर पोहोचले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी