28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजदारू पिण्यावरून दोन जणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

दारू पिण्यावरून दोन जणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

टीम लय भारी

मुंबई : तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन व्यक्तींनी हॉटेल कर्मचाऱ्यावर असंख्य वेळा चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मदुराईच्या मुनीसलाई येथील दुर्गा रेस्टॉरंटमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे (Madurai : Fatal attack on hotel staff).

रेस्टॉरंट मालकासोबत वाद झाल्यानंतर हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मदुराई पोलिसांनी या प्रकरणात चार व्यक्तींना अटक केली आहे.  हा हल्ला आदल्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. पोलिसांनी संबंधित चार व्यक्तींना अटक केली आहे.

Crime : एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह; कांदिवली परिसरात खळबळ

बीड जिल्हा हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लटकवले फासावर

काय आहे प्रकरण 

वासुदेवन, वसंतन, सतीश आणि सेल्वाकुमार हे चार जण दुर्गा रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले होते. त्यावेळी त्यांनी रेस्टॉरंटमध्ये दारू पिण्यास सुरुवात केली. मात्र रेस्टॉरंट मालकाने त्या चौघांना रेस्टॉरंटमध्ये दारू पिण्यास मनाई केली. त्यामुळे त्या चौघांना या गोष्टीचा राग आला आणि रेस्टॉरंट मालकाशी त्यांचा वाद झाला.

‘निर्भया पथक’ मदतीसाठी ‘सक्षम’

Mumbai Crime: Four held for duping insurance policy holders

पोलिसांनी हा हल्ला सुनियोजित असल्याचे सांगितले. हॉटेल मालक उपस्थित नसल्यामुळे कर्मचाऱ्यावर हा हल्ला करण्यात आला. व्हयरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार जणांपैकी एक हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. प्रथम तो कॅश कॉउंटरवर उभी असलेल्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर ते कर्मचाऱ्यावर खंजिराने हल्ला करतो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी