32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमंत्रालयरेशन दुकाने स्वयंसिद्ध : पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास...

रेशन दुकाने स्वयंसिद्ध : पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास सक्षम

टीम लय भारी

मुंबई : गावागावात किराणासामानाचे व जीवनावश्यक सामानाचे वाटप करणाऱ्या रेशन दुकानांतून आतापर्यंत धान्य वितरित केले जाई. याच दुकानात जाऊन आता पासपोर्ट व पॅन कार्ड साठी अर्ज करणे सोपे होणार आहे. त्याच बरोबर पाण्याचे बिल व नियमित वीज बिले सुद्धा या रेशन दुकानांतून भरता येणार आहेत (Ration shops are now able to pay water and electricity bills and apply for Passport, PAN).

ही रेशन दुकाने सीएससी सेवा देणारी दुकाने म्हणून विकसित होतील. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सोयीनुसार अतिरिक्त सेवा निवडण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देण्यात येईल.

भारतीय संघाचे टी २० नंतरचे वेळापत्रक जाहीर, भारतात ह्या ठिकाणी होणार सामने

हसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

या सेवांसोबतच निवडणूक आयोगासंबंधी इतर सेवा सुद्धा या दुकानांमार्फत देण्यात येतील. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना तर होईलच त्याचबरोबर रेशन दुकानांना अतिरिक्त वित्त स्रोत उपलब्ध होतील.

हे निवेदन ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जाहीर केले आहे. रेशन दुकानाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सीएससी इ गव्हर्नंर इंडिया सोबत करार करण्यात आला. त्यात या साऱ्या सुविधांच्या उपलब्धतेचा अहवाल नमूद करण्यात आला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे सुद्धा घोटाळे बाहेर येणार : चंद्रकांत पाटील

Ration shops
पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास सक्षम

Soon, pay your utility bills, get passport forms at ration .shops

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी