26 C
Mumbai
Sunday, November 26, 2023
घरमंत्रालयशिक्षक भरतीच्या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयात सुरक्षा जाळीवर घेतली उडी

शिक्षक भरतीच्या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयात सुरक्षा जाळीवर घेतली उडी

शिक्षक भरती रखडल्याने राज्यातील तरुणांमध्ये संतापाची तीव्र भावना पसरली आहे, याचे प्रंत्यंतर मंगळवारी (दि.26) रोजी मंत्रालयात आले. शिक्षक भरतीच्या मागणीसाठी एका तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारुन जीव धोक्यात घालून आंदोलन केले. यावेळी तरुणाने जोरदार घोषणा देखील दिल्या. दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान राखत तरुणाला ताब्यात घेतले.

गेली काही वर्षे राज्यात शिक्षक भरती प्रक्रीया रखडली आहे, त्यामुळे तरुणांच्या मनात संतापाची लाट आहे. एकतर महागाई त्यात बेरोजगारी त्यामुळे राज्यातील तरुण खिन्न अवस्थेत जगत आहे. नोकरीच्या प्रतिक्षेत महिनोनमहिने वाट पाहून देखील सरकार त्या दृष्ठीने पाऊले उचलत नसल्याने तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे नोकर भरती नाही, दुसरीकडे ज्या नोकरभरतीच्या जाहिराती निघतात, त्या परिक्षेचांचा पेपरफुटीमुळे बोऱ्या वाजत असल्याचे चित्र राज्यात आहे. अशा या दुष्टचक्रमामुळे राज्यातील युवावर्ग विमनस्क अवस्थेला पोहचला असल्याचे अनेक तरुण सांगतात.

हे सुद्धा वाचा 
पवारसाहेबांनी पंकजा मुंडेंना मदतीची भूमिका घेतली होती, पण भाजपने त्यांना डावलले : सुप्रिया सुळे
बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?
अण्णा द्रमुकने सोडली भाजपची साथ, एनडीएमधूनही बाहेर

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून एक तरुण आज मंत्रालयात आला होता. सरकारने शिक्षक भरती करावी अशी या तरुणाची मागणी आहे. हा तरुण आर्थिक परिस्थितीने गरीब आहे, तो उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाच्या मागणीची दखल न घेतल्याने तरुणाने मंत्रालयात सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या जाळीवर उडी घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी तातडीने जाळीवर उतरुन तरुणाला जाळीवरुन बाहेर काढत ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकारामुळे मंत्रालयात काहीकाळ गोंधळ उडाला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी