28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमंत्रालयWinter session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून, सरकारच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार

Winter session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून, सरकारच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार

टीम लय भारी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) यंदा नागपूरऐवजी मुंबईत सोमवारपासून सुरू होत आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस भरवण्यात येणार आहे. दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या आजच्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला आहे.

कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला आलेले अपयश, शेतक-यांना विशेषत: ओला दुष्काळाचा फटका बसलेल्यांना मदत न मिळणे अशा विषयांमुळे भाजपने बहिष्कार टाकला आहे. दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

या अधिवेशनात प्रामुख्याने पुरवण्या मागण्या, शक्ती हा नवीन कायदा आणि त्यासोबत विजेच्या संदर्भातील सरकारने आणलेल्या धोरणावर आणि कृषीविषयक सुधारणा अशी महत्वाची विधेयक मंजूर केली जाणार आहेत. नेहमीप्रमाणे अधिवेशात चालणा-या तारांकित प्रश्नाचा तास आणि इतर अनेक कामकाजही होणार नाही. केवळ तारांकित प्रश्न टेबल केले जाणार आहेत.

काही महत्त्वाच्या लक्षवेधी दुस-या दिवशी घेण्याचे नियोजन आहे. असे असले तरी पुरवण्या मागण्यावरील चर्चा आणि विनियोजन विधेयकांचा वेळ लक्षात घेऊन त्यावरही चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात ‘शक्ती’सारख्या महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदा आणि त्यासंदर्भातील इतर एक विधेयक संमत केला जाणार आहे. त्यावरील चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

विरोधक आक्रमक

सर्वोच्च न्यायालात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला स्थगिती असल्याने त्यावरही विशेष चर्चा होणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबत पदभरती, पदोन्नती आदी विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय साधला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत शिक्षण विभागाने नुकतेच शाळांतील शिपाई, आदी पदे रद्द केल्याने त्यावर शिक्षक आणि पदवीधर आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. कोरोना, कायदा सुव्यवस्था, मराठा आरक्षणानंतर निर्माण झालेली परिस्थिती, मुंबईतील मेट्रो कारशेडचा प्रश्न, शेतक-यांना मदत, अर्णव गोसावींची अटक आदी विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

नागपूर कराराचे उल्लंघन

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर झालेल्या नागपूर करारानुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेणे आवश्यक आहे. यंदा मुंबईत होणा-या हिवाळी अधिशेनामुळे नागपूर कराराचे उल्लंघन झाले आहे. दुसरीकडे मागील फडणवीस सरकारच्या काळात मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीपासून अनेक अडचणी असल्याने पावसाळी अधिवेशन हे नागपुरात आणि हिवाळी अधिवेशन हे मुंबईत घेण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी