26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeसिनेमाकंगनाला ट्विटरचा दणका, बंगाल निवडणुकीवर ट्विट करणे पडलं महागात

कंगनाला ट्विटरचा दणका, बंगाल निवडणुकीवर ट्विट करणे पडलं महागात

टीम लय भारी

मुंबई :- पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या मतदानात ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर कंगनाने अनेक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हॅंडल सस्पेंड करण्यात आले आहे (Actress Kangana Ranaut’s Twitter handle has been suspended). ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली.

बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली.  नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्री कंगना रनौतने ट्वीट करत आक्षेपार्ह भाष्य केले होते (Actress Kangana Ranaut tweeted offensive remarks about alleged violence in West Bengal).

रोहित पवारांची भीती अखेर खरी ठरली, हे ट्विट आलं चर्चेत

कोरोनाची झळ IPL ला लागली आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित; BCCI ची मोठी घोषणा

Kangana Ranaut’s Twitter account permanently suspended

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगना रनौतने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती (Kangana Ranaut had demanded the imposition of presidential rule in West Bengal). अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

‘पंगा क्वीन’ पुन्हा वादात

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) बहुतेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि ट्वीटवरून वादात राहिली आहे. सामाजिक आणि राजकीय प्रत्येक विषयावर कंगना रनौत (Kangna Ranaut) उघडपणे आपले मत व्यक्त करताना दिसते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना रनौत (Kangna Ranaut) टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट करत होती.

सोशल मीडियावर कंगना रनौत (Kangna Ranaut) अनेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ दिसली. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगना रनौतने (Kangna Ranaut) टीएमसीला लक्ष्य केले आहे. कंगना रनौतने (Kangna Ranaut) नुकतेच एक धक्कादायक ट्विट देखील केले होते.

कंगनाने केले रावणाचे कौतुक

कंगना रनौतने (Kangna Ranaut) तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘मी चूकीची होती, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावादक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारी राक्षसी आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.’

कंगनाचे भाजपला उघडपणे समर्थन

सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून कंगना रनौत (Kangna Ranaut) उघडपणे भाजपा आणि पीएम मोदींच्या समर्थनात दिसत आहे. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगना रनौत (Kangna Ranaut)  टीएमसीला लक्ष्य करत होती. टीएमसीने एका भाजपा कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला होता. कंगना रनौतच्या आरोपाची चर्चा होण्यापूर्वीच या अभिनेत्रीचे खाते निलंबित केले गेले आहे (The actress’ account has been suspended even before Kangana Ranaut’s allegations were discussed).

कंगनाच्या अकाऊंटवर निलंबनामुळे अभिनेत्रीचे चाहते खूप निराश झाले आहेत आणि सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत आहेत. ट्विटरने कंगना रनौतवर (Kangna Ranaut) केलेल्या या कारवाईमुळे काही लोक खूश आहेत, तर काही लोक चिडले आहेत. यापूर्वी कंगना रनौतची (Kangna Ranaut) बहीण रंगोली हिचेही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. कंगना रनौत (Kangna Ranaut) हिला नुकतीच ‘पंगा’ आणि ‘मणिकर्णिका’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी