28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसिनेमाअभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या, 'त्या' पोस्टमुळे संशय वाढला!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या, ‘त्या’ पोस्टमुळे संशय वाढला!

टीम लय भारी 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. त्याने इन्सटावर एक पोस्ट केली असून त्याच्या पोस्टमुळे तो नाराज होता असं दिसून येत आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या माहिती समोर आल्यानंतर विश्वास बसत नव्हता. परंतु त्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी