28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeसिनेमाVideo : विद्या बालनचं हे गाणं तुम्ही बघितलं का?

Video : विद्या बालनचं हे गाणं तुम्ही बघितलं का?

टीम लय भारी

मुंबई :  अमेझॉन प्राइम व्हिडिओने एका व्हर्चुअल इवेंटमध्ये आपल्या आगामी बायोपिक ड्रामा -शकुंतला देवीच्या पहिल्या गाण्याचे ‘पास नहीं तो फेल नहीं’ अभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटात ‘ह्यूमन कम्प्यूटर’ अशी ओळख असणाऱ्या गणिताच्या जादूगर शकुंतला देवी यांची भूमिका सकारात आहे. प्रतिभाशाली जोड़ी सचिन-जिगर द्वारे कम्पोज या पेपी गाण्याला पावर हॉउस परफ़ॉर्मर सुनिधि चौहानने गायले असून या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार वायु यांनी लिहिले आहेत.

१०० हून अधिक शहरांमधील डीएवी स्कूल्स आणि महाविद्यालयातील जवळपास ५००० विद्यार्थ्यांनी या व्हर्चुअल इवेंटमध्ये सहभाग घेतला. गाण्याचे अनावरण करण्यासोबतच अभिनेत्री यावेळी झालेल्या एका मजेदार इंटरेक्टिव सत्रात देखील सहभागी झाली होती. गाणे लॉन्‍च झाल्यानंतर, विविध शहरातून जोडून घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीशी गणितासोबत असलेल्या तिच्या संबंधांविषयी संवाद साधण्याची संधी मिळाली.

Advt
जाहिरात

शकुंतला देवीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, “मी 100 हून अधिक शहरांमधील डीएवी स्‍कूल आणि कॉलेजमधील 5000 विद्यार्थ्यांसोबत ‘शकुंतला देवी’च्या पहिल्या गाण्याचे अनावरण करताना मला फार आनंद होतो आहे. या गाण्याचे टाइटल आहे- ‘पास नही तो फेल नहीं।’ हे गाणे खरोखर माझ्या मनाच्या खूप जवळ आहे कारण आकड्यांसोबत संवाद साधण्याची एक मजेशीर पद्धत या गाण्यातून समोर आणण्यात आली असून गणित या विषयाचा फोबिया दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा खूपच गमतीशीर पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. मुलांसोबत हे व्हर्चुअल सेशन करताना आणि त्यांच्यासोबत हा मंच शेयर करताना खूप आनंद आला. हा एक वेगळा परंतु चांगला अनुभव होता कारण आपण या नव्या सामान्यपणासोबत जुळवून घेत आहोत. मला आशा आहे की प्रेक्षक या गाण्याला नेहमीच प्रेम देतील आणि याचे कौतुक करत राहतील ज्याप्रमाणे त्यांनी याच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे.

advt
जाहिरात

जगभरात 200 देश आणि प्रदेशात, अमेझॉन प्राइम व्हिडिओवर…

अनु मेनन द्वारे निर्देशित आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍स प्रोडक्शन आणि विक्रम मल्होत्रा (एबं‍डंशिया एंटरटेनमेंट) द्वारे निर्मित, शकुंतला देवी मध्ये सान्या मल्होत्रा देखील आहे. या सोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही 31 जुलैला जगभरात 200 देश आणि प्रदेशात एक्सक्लूसिवपणे अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी तयार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी