31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रबिरोबाची खोटी शपथ वाहणाऱ्या पडळकरांना धनगर समाज भिक घालत नाही : प्रशांत...

बिरोबाची खोटी शपथ वाहणाऱ्या पडळकरांना धनगर समाज भिक घालत नाही : प्रशांत विरकर

धनगर समाजाच्या आरक्षण विषयी आंदोलन अधिक ज्वलंत होत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल केलेले वक्तव्य हे धनगर समाज बांधवांची दिशाभूल करण्यासाठी केलेला नसता उद्योग आहे. पडळकर सारख्या बिरोबाची खोटी शपथ वाहणाऱ्याला धनगर समाज कवडीचीही किंमत देत नाही, हे लक्षात ठेवावं, असा हल्लाबोल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी केला.

विरकर म्हणाले, यापुढे जर असं वक्तव्य झालं तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसहित भाजपच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये बारामतीच्या आंदोलनास्थळी धनगर समाजाची दिशाभूल करताना धनगर समाजाला सत्तेत आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो असं आश्वासन दिलं होतं. परंतु पूर्ण पाच वर्षाच्या सरकारच्या काळात केंद्रात आणि राज्यात बहुमताचे सरकार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस व भाजप यांनी धनगर समाजाची फसवणूक केली.

आता भाजप सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना धनगर समाजाचा आंदोलन प्रखर होतंय. हे लक्षात येताक्षणी समाजाची दिशाभूल करावी व समाजाचा फडणवीस व भाजप यांच्यावर असलेला रोष काही अंशी बदल व्हावा समाजात झालेली भाजप विरोधातली जागरूकता ही भाजपच्या पचनी पडत नाही, असे विरकर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 
इथे आता २ हजारांची नोट चालणार नाही
अजित पवार यांची मोठी शोकांतिका : पाचवेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्री पदाला हुलकावणी
इतिहास शेतीचा

प्रशांत विरकर म्हणाले, भाजपला भविष्यातील धोका दिसतो आहे, त्याचे कारण म्हणून भाजपने देवेंद्र फडणवीस ज्यांना महाराष्ट्रातील आधुनिक अनाजीपंत म्हणून ओळखलं जातं, त्यांनी भाजपचा एक पाळीव कुत्रा गोपीचंद त्याला नाहक पवारांचं नाव घेऊन भुंकायला लावलेलं आहे. भाजपने असले नसते उद्योग बंद करावेत, अशा उद्योगांनी धनगर समाज भाजपकडे आकर्षित न होता भाजपची दूर जाने पसंत करेल. धनगर समाजातील तरुण पिढी अशा वक्तव्यांना अशा दिशाभूलीला यापुढे कदापिही भुलणार नाही, हे लक्षात ठेवावं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी