29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमुंबईदोन दिवसांपूर्वी कोरोनावरील लस घेतलेले पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचे निधन

दोन दिवसांपूर्वी कोरोनावरील लस घेतलेले पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई : धारावी परिसरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी झटणारे धारावीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या साकिनाका येथे नेमणुकीस असलेले सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे (ACP Ramesh Nangare) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. दोनच दिवसांपूर्वी रमेश नांगरे यांनी कोरोनावरील लस घेतली होती. नांगरे यांच्या निधनाबद्दल मुंबई पोलीस दलातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

धारावी पॅटर्नचे कौतुक जगभरात करण्यात आले आहे. त्यात रमेश नांगरे यांचेही मोठे योगदान होते. त्यासाठीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रमेश नांगरे यांच्या कामगिरीचे कौतुक करत कोविड योद्धा म्हणून नांगरे यांचा गौरव करण्यात आला होता. तसेच कोरोना काळात त्यांनी निभावलेल्या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वच यंत्रणांपुढे आव्हान उभे ठाकले होते. त्यावेळी कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले रमेश नांगरे यांनी धारावीत झोकून देऊन काम केले होते.

लॉकडाऊन, संचारबंदी याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी नांगरे यांनी संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवली. झोपडपट्टीतल्या गल्लीबोळात फिरून त्यांनी शिस्तीचा बडगा उगारला. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्त धारावीत सेवा बजावत असताना धारावी पोलीस ठाण्यातील एकूण ३३ पैकी ३२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्व पोलिसांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले होते. या लढ्यातही रमेश नांगरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी