33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईचांद्रयान मोहिमेची आरास ठरतेय गणेश भक्तांचं आकर्षण

चांद्रयान मोहिमेची आरास ठरतेय गणेश भक्तांचं आकर्षण

भारताने चांद्रयान मोहीम फत्ते केल्याने भारतीयांची मान उंचावलेली आहे. असे असतानाच, यंदाच्या  गणेशोत्सव देखाव्यात चांद्रयान मोहिमेची छाप पडलेली पहायला मिळत आहे.  दीड दिवस ते दहा दिवसांपर्यंतच्या गणेशोत्सवात  ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर सर्वच जिल्ह्यांत चांद्रयान, विक्रम लॅण्डर आणि चंद्रावरील छायाचित्रांचा देखावा साकारलेला दिसत आहे. हे देखावे पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता वाढलेली आहे.

भारत स्वातंत्र्याची ७५  वर्षे साजरा करत असताना भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी चांद्रयान मोहिम यशस्वी केल्याचा आनंद भारतीयांचा गगनात मावेनासा झाला आहे. आजच्या तरुण पिढीला या दिवसाची आठवण कायम राहावी, १९  जुलैपासून अंतराळात पीएसव्ही रॉकेट सोडल्यासून ते २३  ऑगस्ट रोजी चंद्रावर यान उतरेपर्यंत तो कालावधी  भारतासह संपूर्ण जगाने पाहिला आणि प्रत्येक भारतीयांनी आपल्या मनात कोरून एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे म्हणून यंदा सर्व घरगुती गणेशोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चांद्रयान मोहिमेची आरास साकारण्यात आली आहे.

या देखाव्यासाठी शालेय विद्यार्थी ते महाविद्यालयील तरुण  व ज्येष्ठांनी विशेष परिश्रम घेत इकोफ्रेंडली  सजावटी साकारल्या आहेत. त्यामुळे यंदा प्रथम मंदीर व पौराणिक कथांच्या देखाव्यातून बाहेर पडत विज्ञानाची कास धरताना गणेशभक्त दिसत आहेत.

चांद्रयान मोहिमेसाठी लागणारे इंजिनाचे पार्ट हे विक्रोळीतील गोदरेज अ‍ॅण्ड बॉईज या कंपनीने तयार केले तर मुख्य रॉकेटसाठी लागणारे पार्ट एल अ‍ॅण्ड टी कंपनीने तयार केले आहेत. याबरोबरच भारतातील इतरही अनेक नामांकित कंपन्यांचा यात हातभार लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ, भारतीय खगोल शास्त्रज्ञांची मेहनत आणि इस्त्रोमध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ, अधिकारी कर्मचार्‍यांच्या मेहनतीचे फळ  म्हणून की काय आज भारताने चांद्रयान मोहिम यशस्वी केली आहे.

हे सुद्धा वाचा
मोदी सरकारने संविधानातुन समाजवादी, धर्मनिरपेक्ष शब्द हटवले; कॉँग्रेस खासदाराचा धक्कादायक खुलासा
अजित पवार यांची मोठी शोकांतिका : पाचवेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्री पदाला हुलकावणी
इतिहास शेतीचा

ठाण्यात वास्तव्यास असलेले गोरदेज अ‍ॅण्ड बॉईज कंपनीतील कर्मचारी विजय जाधव यांच्या टीमने चांद्रयानाचे पार्ट बनविण्यासाठी खारीचा वाटा उचलला. ही मोहिम यशस्वी झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नाही. म्हणूनच त्यांच्या घरगुती गणपती आरासमध्ये चांद्रयान मोहिम साकारण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडलेल्या अनेक गणेश भक्तांनी ही आरास साकारून ही मोहिम आपल्या हृदयावर कायम कोरून ठेवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी