30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणवासीयांसाठी अनोखी स्पर्धा; 'खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा!'

कोकणवासीयांसाठी अनोखी स्पर्धा; ‘खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा!’

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून मागील काही दिवसांत रान उठलेले असतानाच आता वैतागलेल्या कोकणवासीयांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा हायवेवर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी “हायवेवरील खड्डे स्पर्धा – 2023” या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतीय पदवीधर प्रतिष्ठान, कोकण सेना आणि युवाशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले असून गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा हायवेवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो, व्हिडिओ किंवा व्हिडिओ रील बनवून पाठवण्याचे आवाहन आयोजनकर्त्यांनी केले आहे. या खड्ड्यांसोबत स्वतःचा सेल्फी काढून पाठवणाऱ्या स्पर्धकांना याबद्दल पुरस्कारही मिळणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असून कोकणातील विजेत्या स्पर्धकांना तब्बल 21 पुरस्कार दिले जाणार आहेत.

काय असणार स्पर्धेचे नियम?

स्पर्धेतील स्पर्धकांनी खड्यांसोबत स्वतःचा सेल्फी काढून ऑनलाईन फोटो, व्हिडिओ किंवा व्हिडिओ रील पाठवणे गरजेचे आहे. स्पर्धक हा कोकणातील रहिवाशी हवा ही अट बंधनकारक आहे. याशिवाय स्पर्धकांनी खाली दिलेली माहिती पाठविणे गरजेचे आहे.

1. स्पर्धकाने स्वतःचे नाव
2. परिचय
3. शहर/गावचा पत्ता
4. मोबाईल क्रमांक
5. रस्त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ किंवा व्हिडिओ रील काढलेल्या संबंधित जिल्ह्याचे, तालुक्याचे / गावाचे ठिकाणाचे नाव
6. संबंधित विधानसभा आणि लोकसभा क्षेत्राचे नाव

विजेत्यांसाठी केली जाणार बक्षिसांची लयलूट

या स्पर्धेत स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असून विविध विभागांतील विजेत्या स्पर्धकांना तब्बल 21 पुरस्कार दिले जाणार आहेत.

संपूर्ण कोकण विभागासाठी स्पर्धेचे बक्षीस स्वरूप

कोकण विभाग – प्रथम क्रमांक – कोकणभूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
कोकण विभाग – द्वितीय क्रमांक – कोकणगौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
कोकण विभाग – तृतीय क्रमांक – कोकणगुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

रायगड जिल्हा विभागासाठी स्पर्धेचे बक्षीस स्वरूप

रायगड जिल्हा विभाग – प्रथम क्रमांक -रायगड भूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रायगड जिल्हा विभाग – द्वितीय क्रमांक -रायगड गौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रायगड जिल्हा विभाग – तृतीय क्रमांक -रायगड गुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

रत्नागिरी जिल्हा विभागासाठी स्पर्धेचे बक्षीस स्वरूप

रत्नागिरी जिल्हा विभाग – प्रथम क्रमांक -रत्नागिरी भूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रत्नागिरी जिल्हा विभाग – द्वितीय क्रमांक -रत्नागिरी गौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रत्नागिरी जिल्हा विभाग – तृतीय क्रमांक -रत्नागिरी गुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

सिंधुदुर्ग जिल्हा विभागासाठी स्पर्धेचे बक्षीस स्वरूप

सिंधुदुर्ग जिल्हा विभाग – प्रथम क्रमांक -सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
सिंधुदुर्ग जिल्हा विभाग – द्वितीय क्रमांक -सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
सिंधुदुर्ग जिल्हा विभाग – तृतीय क्रमांक -सिंधुदुर्ग गुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

याशिवाय, स्पर्धेत सामाजिक संस्था / संघटना / गाव किंवा शहरातील मंडळेदेखील सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठीही विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.

रायगड जिल्हा विभागातील सामाजिक संस्था / संघटना / गाव किंवा शहरातील मंडळांसाठी बक्षीस स्वरूप

रायगड जिल्हा विभाग – प्रथम क्रमांक -रायगड भूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रायगड जिल्हा विभाग – द्वितीय क्रमांक -रायगड गौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रायगड जिल्हा विभाग – तृतीय क्रमांक -रायगड गुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

रत्नागिरी जिल्हा विभागातील सामाजिक संस्था / संघटना / गाव किंवा शहरातील मंडळांसाठी बक्षीस स्वरूप

रत्नागिरी जिल्हा विभाग – प्रथम क्रमांक – रत्नागिरी भूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रत्नागिरी जिल्हा विभाग – द्वितीय क्रमांक – रत्नागिरी गौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
रत्नागिरी जिल्हा विभाग – तृतीय क्रमांक – रत्नागिरी गुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

सिंधुदुर्ग जिल्हा विभागातील सामाजिक संस्था / संघटना / गाव किंवा शहरातील मंडळांसाठी बक्षीस स्वरूप

सिंधुदुर्ग जिल्हा विभाग – प्रथम क्रमांक – सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
सिंधुदुर्ग जिल्हा विभाग – द्वितीय क्रमांक – सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी
सिंधुदुर्ग जिल्हा विभाग – तृतीय क्रमांक – सिंधुदुर्ग गुणीजन पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी

हे ही वाचा 

भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

कोकणवासीय गणेश भक्तांना वाहतूक कोंडी आणि खड्ड्याचे विघ्न

गणरायाच्या आगमनाअगोदर रस्ते खड्डेमुक्त करा; अश्विनी भिडे यांचे आदेश 

या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना 7977934800 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर आपला फोटो, विडिओ किंवा रील पाठवावा लागेल. यासाठी अंतिम तारीख 2 ओक्टोम्बर 2023 आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या सामाजिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजनकर्त्यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी