31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईज्यांचे फोटो ट्रेंडिंगला असायचे, त्याच दानिश सिद्दीकीचा अफगाणिस्तानात गोळीबारात मृत्यू

ज्यांचे फोटो ट्रेंडिंगला असायचे, त्याच दानिश सिद्दीकीचा अफगाणिस्तानात गोळीबारात मृत्यू

टीम लय भारी

मुंबई :- भारताचे फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानच्या कंदहार येथे पत्रकारिता करताना मृत्यू झाला आहे. अफगणिस्तानात राहणारे भारताचे राजदूत फरीद मामुन्दजई यांनी दानिश यांच्या मृत्यूची बातमी ट्विट करून दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी ते मुख्य फोटोग्राफर म्हणून काम करत होते. ते चाळीस वर्षांचे होते (Danish Siddiqui shot dead in Afghanistan).

दानिश सध्या अफगाणिस्थान आणि तालिबान यांच्यातील संघर्षाच्या बातमीचे कव्हरेज करत होते. फरीद यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल रात्री कंधार येथे माझे मित्र दानिश सिद्दीकिंची हत्या झाल्याची दुःखद बातमी ऐकून मन अस्वस्थ झाले. भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेते अफगाण सुरक्षा दलांमध्ये एम्बेड केले होते. त्यांचे काबुलला निर्गमन होण्याच्या २ आठवड्यांपूर्वी मी त्यांना भेटलो. त्यांचे कुटुंब आणि रॉयटर्स यांना सहानुभती. असे म्हणत फरीद यांनी दानिश यांचा फोटो पोस्ट केला आहे (Saying this, Farid has posted a photo of Danish).

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

दहावीचा निकाल अजून टांगणीवर

2018 मध्ये त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना म्यानमारमध्ये रोहिंग्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराचे दस्तावेज गोळा करज्यासाठी मिळाला होता. 2020 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या दंगलीत त्यांनी काढलेले फोटो खूप चर्चेत आले होते.

Danish Siddiqui shot dead in Afghanistan
दानिश सिद्दीकी

आपल्यासाठी हा धोक्याचा इशारा; मोदींचे मुख्यमंत्र्यांना संकेत

Danish Siddiqui, Reuters chief photographer, killed in Afghanistan

दानिश यांना 2017 साली रोहिंग्या संकटाच्या कालावधीमध्ये काढलेल्या एका फोटोसाठी पत्रकारिता क्षेत्रात छायाचित्रकारांना देण्यात येणारा सर्वोच्च असा पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. तसेच दिल्लीमधील दंगली, कोरोना कालावधीमध्ये प्रवासी मजुरांना सामाना करावी लागलेली संकटे आणि कोरोना काळात स्मशनांमधील दानिश यांनी काढलेले फोटो चांगलेच चर्चेत आलेले (Photos taken by Danish in cemeteries during the Corona period were well-received).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी