35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयप्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

टीम लय भारी

मुंबई :- मोदी सरकारच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य जनेतला अतिशय त्रास सहन करावा लागत आहेत. इंधन वाढ, घरघुती सिलेंडर वाढ, खाण्याचे तेल या सर्व गोष्टींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. याला विरोध करत सोलापूर येथे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आंदोलन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मीडियासमोर यायला घाबरत आहेत, अशी बोचरी टीका ही प्रणिती शिंदे यांनी मोदींवर केली आहे (Praniti Shinde scathing criticism of Modi).

या सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागली आहे. या मोदी सरकारला सर्वसामान्यांची काहीही काळजी नाही आहे. कोरोना संकटात मोदी सरकारने योग्य नियोजन केले असते तर इतके लोक मृत्यूमुखी पडले नसते. सगळ्या बाजूने सरकारची कोंडी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मोदी सरकारची बोलती बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. ते मीडियासमोर यायला घाबरत आहेत, अशी बोचरी टीका प्रणिती शिंदे यांनी मोदींवर केली आहे.

दहावीचा निकाल अजून टांगणीवर

आपल्यासाठी हा धोक्याचा इशारा; मोदींचे मुख्यमंत्र्यांना संकेत

यानंतर प्रणिती शिंदे म्हणाल्या, प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसने सोलापुरात पेट्रोल पंपावर वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या 7 रेसकोर्सवर महागाईचा निषेध म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. सिलेंडरचे दर वाढल्यामुळे आमच्यावर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे (It is time for us to cook on the stove as the price of cylinders has gone up).

Praniti Shinde scathing criticism of Modi
प्रणिता शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

Pankaja urges supporters to withdraw resignations, says ‘not finished, not afraid’

लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढल्याने युवकांची अडचण झाली आहे. सर्वसामान्यांवर लॉकडाऊनचे संकट असताना इंधन दरवाढ करून केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे आम्ही देशभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत, असे प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले (This was stated by Praniti Shinde).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी