30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयचीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

चीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या कामाचे कौतुक केले होते. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावर हसा, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे (Rahul Gandhi lashed out at Modi over China issues).

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या कामाचे कौतुक केले होते. कोरोना काळात उत्तर प्रदेशात चांगले काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.

ज्यांचे फोटो ट्रेंडिंगला असायचे, त्याच दानिश सिद्दीकीचा अफगाणिस्तानात गोळीबारात मृत्यू

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावे. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचे स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे (Rahul Gandhi has criticized that all the people who left the Congress belonged to the Sangh).

राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचे आवाहन केले. भाजपकडून पसरविण्यात येणाऱ्या फेक न्यूजवर विश्वास ठवणे आता लोकांनी बंद केले आहे. त्यामुळेच आता भाजपच्या फेक न्यूजबाबत घाबरण्याचे कारण नाही, असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Rahul Gandhi lashed out at Modi over China issues
राहुल गांधी आण पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहावीचा निकाल अजून टांगणीवर

Destroyed in seconds what took centuries to build: Rahul Gandhi’s dig at Modi government

तसेच, राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केले होते. सुरक्षा समितीत डोकलामसहीत सीमेवरील हालचालींवर चर्चा करण्याची मागणी राहुल यांनी केली होती. मात्र, समितीने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे समितीचा निषेध म्हणून राहुल यांनी सभात्याग केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी