29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमुंबईमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अपंगांच्या बढतीसाठी प्रयत्न सुरू

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अपंगांच्या बढतीसाठी प्रयत्न सुरू

टीम लय भारी

मुंबई : दिव्यांगांच्या समस्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाबाबत तात्काळ कार्यवाही करून मंत्रिमंडळात प्रस्ताव आणण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अपंगांच्या बढतीसाठी प्रयत्न सुरू

दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या विविध संघटनांच्या मागणीनुसार श्री. भरणे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, उपसचिव टी. व्ही. करपते यांच्यासह दिव्यांग कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दिव्यांगांच्या आरक्षणाबाबत तात्काळ कार्यवाहीने निर्देश राज्यमंत्री श्री. भरणे यांनी दिल्यानंतर त्यांना माहिती देण्यात आली की, वर्ग ‘क’ आणि ‘ड’ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वर्ग ‘अ’ व ‘ब’ मधील अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावा, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी