31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमुंबईन्याय योद्धा राहुल गांधी यांच्या उद्या बुधवार २४ एप्रिल रोजी अमरावती व...

न्याय योद्धा राहुल गांधी यांच्या उद्या बुधवार २४ एप्रिल रोजी अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदान, नबील कॉलनी, बैतुल रोड याठिकाणी सकाळी ११ वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झीबिशन ग्राउंड, मरिआई चौक येथे दुपारी ३.५५ वाजता प्रचार सभा होत आहे. अमरावतीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे,

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदान, नबील कॉलनी, बैतुल रोड याठिकाणी सकाळी ११ वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झीबिशन ग्राउंड, मरिआई चौक येथे दुपारी ३.५५ वाजता प्रचार सभा होत आहे. अमरावतीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, (Justice fighter Rahul Gandhi will hold public meetings in Amravati and Solapur on Wednesday, April 24)

माजी मंत्री व CWC सदस्य यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जयश्री वानखडे, अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, प्रीती बंड, सुनील खराटे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रदीप राऊत, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, संगीता ठाकरे, वर्षा भटकर यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

सोलापूर येथील सभेला राहुलजी गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उमेदवार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व लोकसभेच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट नेते माजी आ. नरसय्या आडम, दिलीप माने, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात सुरु असून राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भंडारा-गोंदिया मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची १४ एप्रिल रोजी नागपुरमध्ये जाहीर सभा झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी