29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुर शहरात पावसाचा कहर; पुरस्थितीमुळे लोकांचे हाल

नागपुर शहरात पावसाचा कहर; पुरस्थितीमुळे लोकांचे हाल

गेल्या आठवड्याभरापूर्वी दडी मारून बसलेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात धो धो बरसणाऱ्या पावसाने काही जिल्ह्यांत मात्र अजूनही विश्रांती घेतली आहे. अश्यातच, शुक्रवारी (22 सप्टेंबर) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शरात पुरस्थिति निर्माण झाली. शहरात फक्त चार तासांच्या आत १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळला. यामुळे, ढगफुटीसादृश्य परीस्थिती निर्माण होऊन नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. यामध्ये एक वयोवृध्द्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

नागपूर शहरात चार तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळला. यामुळे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे, शहरांमध्ये पुर परिस्थिति निर्माण झाली. पावसाच्या जोरामुळे अंबाझरी तलाव आणि गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाला. यामुळे, नागनदी, पिवळी नदीला पूर येऊन पुराचे पाणी सखल भागात शिरले. पुराचे पाणी झोपडपट्टींसह उच्चवर्गीय वसाहतींमध्येही शिरले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. महेश नगर येथील मिराबाई पिल्ले (वय ७०) या महिलेचा मृत्यू झाला.


शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अजूनही काही लोक पुरात अडकले असून लष्कर तसेच अग्निशमक दलाच्या जवानांनी सगळी सूत्रे हातात घेतली आहेत. लष्कर तसेच अग्निशमक दलाच्या जवानांकडून बचावकार्याचे काम तेजीत चालू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष देत बचवकार्याचे आदेश दिले आहेत.

अंबाझरी परिसरातील डागा ले-आऊईटमध्ये घरांमध्ये चार फुटांवर पाणी गेल्याने येथील नागरिकांना बचाव पथकाने बोटीने बाहेर काढले. रस्त्यांना नदीचेस्वरूप प्राप्त होऊन रस्त्यांवर पार्क केलेल्या कार पाण्यावर तरंगताना दिसल्या.

नागनदीचे पाणी शिरल्याने नंदनवन परिसरात लोकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यामुळे या भागातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. नागनदीला पूर आल्याने नंदनवन परिसरातील घरात पुराचे पाणी साचल्याने लोकांचे खूपच हाल झाले. लोकांनी रात्र जागून काढत घरातील पाणी बदल्यांनी बाहेर काढण्यात रात्र घालवली.


काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूरमध्ये जवळपास ४ तासांमध्ये १०९ मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला. त्यातील ९० मिलीलीटर पाऊस केवळ दोन तासात झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रचंड तीव्रता पाहायला मिळाली. यामुळे आंबाजरी तलाव भरून पाणी वाहिलं. हे अतिरिक्त पाणी नाग नदीतून वाहतं. त्यामुळे नाग नदीला मोठ्या प्रमाणात पूर झाल्याची स्थिती निर्माण झाली. नाग नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. आंबाजरी ले आऊट, वर्मा ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगरपासून पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि नंदनवनपर्यंत नाग नदीच्या दोन्ही बाजूला पाणी शिरलं. तळ मजल्यात तर पाणी शिरलंच, पण अनेकांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं,”

हे ही वाचा 

लालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण

सोलापूर शहरात हातभट्टी दारूला लगाम! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठिकठिकाणी धाडसत्र..

लोकशाही चॅनल 72 तास बंद ठेवण्याचे आदेश

हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार सकाळी ८.३० पर्यंत ११६.५ मिमी ची नोंद करण्यात आली. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी