28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमुंबईशिवसेनेच्या नगरसेवकाला खरमरीत पत्र !

शिवसेनेच्या नगरसेवकाला खरमरीत पत्र !

सन्माननीय उपेंद्रजी सावंत,

( Letter to Shivsena corporator )

आपण आमच्या कन्नमवारनगरचे नगरसेवक आहात. म्हणजे पालक आहात. कन्नमवारनगरचे आरोग्य अबाधित राखणे हे आपले आद्य आणि मूलभूत कर्तव्य आहे. पण सोबतची छायाचित्रांतील सुस्पष्ट दृष्ये काय सांगतात? याला जबाबदार कोण ? कन्नमवारनगरवासीय की आपण नगरसेवक ??

Letter to Shivsena corporator

‘कोरोना’ने तर कन्नमवारनगरला अजगरासारखा विळखा घातला आहे. याला जबाबदार कोण ? फक्त कन्नमवारनगरवासीयच की चिखलात बसकन मारून रवंथ करीत शेपटीने माशा मारीत म्हशीसारखे बसलेले लोकप्रतिनिधी ? मुबई महानगरपालिका आणि आपत्कालिन व्यवस्था… ??

( Shivsena corporator ignore to problems of Kannamwarnagar )

शिवसेनेच्या नगरसेवकाला खरमरीत पत्र ! शिवसेनेच्या नगरसेवकाला खरमरीत पत्र !

आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा हा एकूण प्रकार आहे. उपेद्रजी मला सांगा, एस वॉर्डने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट नमूद केलेले असताना आपण महापालिकेचे अधिकारी सोबत घेऊन कन्नमवारनगरमधील किराणा मालाची दुकाने का बंद केलीत ?

शिवसेनेच्या नगरसेवकाला खरमरीत पत्र !
जाहिरात

काही किराणा दुकाने अजुनही सुरू का नाहीत ? हा का़य प्रकार आहे ? आपल्या नजिकच्या वॉर्डात आपल्याच ऐतिहासिक पक्षाची सुवर्णा करंजे ही महिला नगरसेविका पायाला भिंगरी बांधल्यागत सकाळ – संध्याकाळ कोरोनाच्या उच्चाटनासाठी झगडत आहे.

Letter to Shivsena corporator

कन्नमवारनगरचे कार्यसम्राट नगरसेवक मग का गपगार का बसले आहेत असा प्रश्न कलावती देवीच्या मंदिराला पडला आहे. उपेंद्रजी पोरगं बावळट असलं तरी बाप त्याला वादळात फेकून देत नाही. आपण का करताय असं ?

अवघ्या कन्नमवारनगरचे आरोग्य, आयुष्य, अस्तित्वच वैश्विक अरिष्ठात पणाला लागले असताना का वागताय असं ? अजूनही वेळ गेलेली नाही..! शिवसेना ज्या छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत मानते त्या महापुरुषाला त्रिवार वंदन करुन कोरोनाला भूईसपाट करण्यासाठी सुसज्ज व्हा.

शिवसेनेच्या नगरसेवकाला खरमरीत पत्र !
जाहिरात

आपण जर विधायक, उपक्रमशील आणि निर्णायक हाक दिलीत तर प्रत्येक कन्नमवारवासीय ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात छातीचा कोट करील ..! हातात हात घेत सलोख्याने, सौजन्याने आणि सौहार्दाने कन्नमवारनगरवरील कोरोनाचे अरीष्ठ नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्या

चंद्रकांत साळसकर ( मुंबई )

( लेखक हे पत्रकार आहेत, आणि कन्नमवारनगर येथील रहिवाशी आहेत )

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी