34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईपोलिस भरतीवेळी 6 जणांचा नाहक बळी; पोलिस प्रशासनाने घेतला धडा!

पोलिस भरतीवेळी 6 जणांचा नाहक बळी; पोलिस प्रशासनाने घेतला धडा!

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पोलीस भरतीचा अंतिम चाचणीचा टप्पा आज पार पडणार आहे. 15 फेब्रुवारी सुरू झालेल्या या घोडदौडला अखेर विराम मिळणार आहे. पोलीस भरती चाचणीवेळी अनेकदा गडबड गोंधळ झालेला पहायला मिळतो. मागच्या भरतीवेळी चाचणी प्रक्रियेदरम्यान जवळजवळ 6 जणांचे मृत्यू झाल्याने पोलीस विभागाला टिकेचा सामना करावा लागला होता. यावरून धडा घेत पोलिस विभाग प्रशासनाने काही नियमांमध्ये बदल केले आहेत.

गेल्या भरतीवेळी झालेल्या मृत्यूचा विचार करून यंदा 5 किमी धावण्याच्या चाचणी ऐवजी 1600 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली, त्याचबरोबर उन्हाचा तडाखा बसू नये, म्हणून धावपट्टीवर मंडप टाकण्यात आला होता. मात्र, एक युवक धावण्याची चाचणी पूर्ण करताच कोसळला, त्याला काही सेंकदात डॉक्टरांची मदत मिळाली. पण तो वाचू शकला नाही. तसेच एक जण चाचणी देऊन जिथे रहात होता, तिथे गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर एकाचा चाचणी झाल्यानंतर कपडे घालत असताना मृत्यू झाला. याचीच दक्षता घेता पोलीस सर्जन डॉक्टर कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली वैद्यकीय पथक पहाटे 5 वाजल्यापासून मैदानावर तैनात ठेवण्यात आले होते.

याबाबत डॉक्टर कपिल पाटील म्हणाले की, यंदा आम्ही पोस्ट मार्टम विभागातील 13 डॉक्टरही सज्ज ठेवले होते. तसेच मैदानावर असणाऱ्या सर्व परिक्षकांना सीपीआरचे ट्रेनिंग दिले होते. यावेळी डॉक्टरांसोबत सिस्टर, वॉर्डबॉय यांनाही वेळेनुसार कर्तव्यावर ठेवले होते. तसेच प्रत्येक ग्राऊंडवर एक कार्डियाक रुग्णवाहिका, शासकीय रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

पोलीस मुख्यालय मरोळ, नायगाव, कलिना विद्यापीठ येथे भरती चाचणी घेण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारी चाचणी परीक्षा रात्री 10 वाजेपर्यंत सुरुवातीला चालली होती. या प्रक्रियेत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि सह आयुक्त एच. जयकुमार यांनी जातीने लक्ष घातले, त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.

यावेळी वैद्यकीय पथकांची चोख व्यवस्था ठेवल्याने या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज्यातील सर्वात मोठी पोलीस भरती करण्यात आली. यंदा 5,63,451 पोलीस कॉन्स्टेबल तर 1,17,844 पोलीस चालकांसाठी भरती पार पडली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा:

योगी सरकारचा अ‍ॅक्शन मोड : गँगस्टर बंधूंच्या हत्येनंतर यूपीत कलम 144 लागू; इंटरनेट बंद, 17 पोलिसांचे निलंबन!

प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच झाली चकमक; गँगस्टर बंधूंच्या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल

माफिया आतीक अहमद आणि अशरफची गोळ्या घालून हत्या

Police recruitment, Police recruitment process in maharashtra, महाराष्ट्र पोलीस भारती 2023, Maharashtra Police Bharti, Maharashtra Police Bharti : police administration changed some rules

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी