29 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयशिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का? या सरकारचे सर्व घोटाळे बाहेर आणणार;...

शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का? या सरकारचे सर्व घोटाळे बाहेर आणणार; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले!

माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा समाचार घेतला. ‘राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून मेट्रो 6 च्या कारशेडसाठी कांजुरमार्गची जागा ‘एमएमआरडीए’कडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. ‘मुंबईवर पहिला वार करून मेट्रोची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत नेण्यात यश मिळवल्यानंतर आता एका मेट्रो मार्गासाठी कांजुरमार्गचीच जागा निवडण्यात आली आहे. या शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का आहे?’ असा प्रश्न करत हे घोटाळे सर्व बाहेर आणण्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आले होते. पण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. कांजूरमार्गमधील ती 15 हेक्टर जागा कोणाची? अशी विचारणा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

पहा ट्विट –

कांजूरमार्ग जागेवरून वाद झाला असताना त्याच जागेवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारचा मुंबईवर राग कशासाठी? कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड कारशेड होऊन मुंबईकरांचा वेळ, पैसा वाचला असता, यात राज्य सरकारने खोडा का घातला असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, महसूल खात्याने कलेक्टरला सांगितले आहे की, मेट्रो 6 साठी आपण कांजूरमार्गच्या जागेपैकी 15 हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करावी, आजची ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून मोठी आहे. यातून एकच सिद्ध होते की, आम्ही गेल्या अडीच तीन वर्षे जे बोलत आलो आहोत की, मेट्रो 6 साठी कांजूरमार्गची कारशेड गरजेची आहे. या कारशेडसाठी 2018 मध्ये टेंडर काढले होते, पण कारशेड बनवणार कुठे हा प्रश्नच होता. यामध्ये मुंबईकरांचे पैसे वाचविण्यासाठी कारशेड एका ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 4 कारशेड एकत्र करणार असल्याने महाराष्ट्राचे त्यामुळे 10 ते साडेदहा हजार कोटी वाचणार होते.

पुढे आदित्य म्हणाले की, लाईन 4 आणि 14 याचा कारशेड ठाण्यात होणार आहे. यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांचे काय हितसंबंध आहेत ते पहावे लागेल. आम्ही हे काम हाती घेतल्यानंतर त्यावेळी आरेमधील आदिवासी जनतेला ती जागा राहिली असती. मात्र, महाराष्ट्र भाजप आणि इतर जणांनी कोर्टात गोंधळ घातला. अनेक आंदोलने झाली. आता झाडे कापण्याचा प्रयत्न सुरू असून आणखी झाडे तोडली जाणार आहेत. या घटनाबाह्य सरकारचा एवढा राग का आहे? हे घोटाळे सर्व बाहेर आणणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्र्यांची केवळ फोटोसाठी तडजोड; आदित्य ठाकरे कडाडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या वॉर्ड बॉय ला पुण्यातून अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी केले स्वागत

Aditya Thackeray allegations of Mumbai Metro car shed scam on shinde government, Aditya Thackeray, Mumbai Metro car shed scam, shinde government, cm shinde, eknath shinde, BJP, Shiv Sena

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी