25 C
Mumbai
Sunday, November 26, 2023
घरमुंबईखुशखबर! सार्वजनिक बांधकांम विभागात 2109 पदांची सरळसेवा मेगाभरती

खुशखबर! सार्वजनिक बांधकांम विभागात 2109 पदांची सरळसेवा मेगाभरती

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 14 संवर्गातील एकूण 2109 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी सा. बा. प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता, मुंबई कार्यालयाकडून राज्यातील जिल्हा केंद्रांवर ऑनलाइन (computer Based Test) परीक्षा घेण्यात येणार आहे. खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणासह प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी आरक्षण असणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023, ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 16 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2023 तसेच परीक्षा दिनांक व कालावधी hhps://mahapwd.gov.in या संकेत स्थळावरून उपलब्ध होतील.

या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित) एकूण पदे 532, कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट-ब अराजपत्रित) पदे 55, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-ब अराजपत्रित) पदे 5, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), पदे 1378, लघुलेखक (उच्चश्रेणी), (गट-ब अराजपत्रित) (मुंबई, औरंगाबाद, नांदेड, नागपूर पदे 8, लघुलेखक (निम्नश्रेणी) , (गट-ब अराजपत्रित) पदे 2, उद्यान पर्यवेक्षक (गट-क) पदे 12, सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क) पदे 9, स्वच्छता निरीक्षक (गट-क) पदे-1, वरिष्ठ लिपिक (गट-क) (नांदेड, औरंगाबाद, नागपूर) पदे-27, प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) (नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद पदे-5, वाहनचालक (गट-क) (नांदेड) पदे-2, स्वच्छक(गट-ड ) पदे 32, शिपाई (गट-ड) (मुंबई मंत्रालय, अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक) पदे 41 अशी आहेत.

उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास 30 मिनिटे (90 मिनिटे) अगोदर उपस्थित रहावे.

हे सुद्धा वाचा
बेपत्ता मुलींबाबत रुपाली चाकणकरांचं माैन का? रोहिणी खडसेंचा सवाल
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल कोसळला, आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण
गर्भपाताबद्दल काय आहे ‘सर्वोच्च’ निकाल?

वयोमर्यादा

अमागास किमान 18 आणि कमाल 40, मागासवर्गीय/ अनाथ/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 18- 45, माजी सैनिक- अमागास 18-40+ सैनिकी सेवेचा कलाधी+3, दिव्यांग 18-45, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त 18-45, पदवीधर अंशकालीन 18-55 अशी वयोमर्यादा आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (परीक्षेचा कालावधी -90 मिनिटे), लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) (परीक्षेचा कालावधी 45 मिनिटे), उद्यान पर्यवेक्षक, सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, (परीक्षेचा कालावधी -90 मिनिटे), वाहनचालक (परीक्षेचा कालावधी 45 मिनिटे), स्वच्छक,शिपाई (90 मिनिटे)

परीक्षेचे स्वरूप
ऑनलाइन (computer Based Test) परीक्षा घेण्यात येणार आहे.परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील.  एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठिणता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याच्या पद्धतीने गुणांक निश्चित करून निकल जाहीर करण्यात येईल.  प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध होतील. प्रश्नपत्रिकेतील प्राशनाबाबत उमेदवारास काही हरकती असल्यास प्रति प्रश्न 100 रुपये इतके शुल्क आकारले जाईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी