29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयबेपत्ता मुलींबाबत रुपाली चाकणकरांचं माैन का? रोहिणी खडसेंचा सवाल

बेपत्ता मुलींबाबत रुपाली चाकणकरांचं माैन का? रोहिणी खडसेंचा सवाल

राज्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महिलांच्या बेपत्ताबाबत होण्याबाबत माहीती दिली होती. एवढेच नाही तर राज्यातील एकूण 19 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर या पांच वर्षात 14 हजार मुली बेपत्ता झाल्याचे ते बोलत होते. तर आता याच मुद्याला अनुसरण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील याबबात खुलासा केला आहे. यांनी देखील एक ट्वीट करत बुलढाणा जिल्हयातील एकूण किती मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. याबाबात आता थेट आकडा सांगितला आहे, असे असताना त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना सवाल केला आहे.

राज्यात काही वर्षांपासून महिला आणि मुलींची संख्येत घट होताना दिसत आहे. आशा परिस्थितित महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. ही परिस्थिति राज्यातील प्रत्येक भागात जाणवू लागली आहे. याचा परिणाम हा आता महिला आणि मुलींच्या असुरक्षिततेवर होताना दिसतो. 21 व्या शतकातही आज महिला किती सुरक्षित आहेत? त्याचप्रमाणे महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत? यामागची कारणे अजूनही पुढे आली नाहीत. मात्र काही महिला आणि मुलींचे अपहरण केल जाते. काहींवर बलात्कार केला जातो. याबाबत आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यावर ट्वीट करत महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा

युद्ध का थांबत नाही?

गर्भपाताबद्दल काय आहे ‘सर्वोच्च’ निकाल?

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल कोसळला, आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण

बुलढाणा जिल्ह्यात 157 महिला आणि मुली या बेपत्ता आहेत. त्यापैकी 35 मुली या अल्पवयीन होत्या. तर त्यातील 55 मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना यश आले. मात्र या मुलींसोबत किडनॅपिंगनंतर बलात्कार झाल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आता रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना सुनावले आहे. बुलढाण्यातील घडलेल्या प्रकरणी त्या येऊन गेल्या मात्र याबाबत अजूनही त्यांनी कुठेही अवाक्षर काढले नाही, असे रोहिणी खडसेंनी ट्वीट करत रूपाली चाकणकरांना धारेवर धरले आहे.

रोहिणी खडसेंचे ट्वीट 

बुलढाणा जिल्ह्यातील गेल्या 9 महिन्यात 557 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 35 अल्पवयीन मुली कुठे आहेत हे अद्याप समजले नाही. ज्या 55 मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आला, त्यापैकी काहींवर किडनॅपिंगनंतर बलात्कार झाल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय महिलांवरील अत्याचारांच्या इतरही अनेक घटना 9 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात घडल्या आहेत. याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बुलढाणा जिल्ह्यात येऊन गेल्या मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांनी याबद्दल अवाक्षर देखील काढले नाही. ना पोलीस प्रशासनासोबतच्या चर्चेत ना आढावा बैठकीत. असे ट्वीट करत रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर टिका केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी