26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईMetro car shed : CM ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक? मेट्रोचे कारशेड बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित...

Metro car shed : CM ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक? मेट्रोचे कारशेड बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित जागेत? चाचपणी सुरु

टीम लय भारी

मुंबई : कांजूरमार्गच्या जागेवर उभारण्यात येणा-या मुंबई मेट्रो 3च्या (Mumbai Metro) कारशेड (Metro car shed) कामाला मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्टे ऑर्डर’ दिली आहे. यामुळे हा वाद दिर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील (Bandra-Kurla Complex) बुलेट ट्रेनसाठीच्या (bullet train) प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील जागेबाबत आपला निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.17) एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत मेट्रो 3च्या कारशेडचे काम तात्पुरते मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेटसाठीच्या प्रस्तावित जागेवर हलवले जाऊ शकते का याची चाचपणी करण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीची प्रस्तावित जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. यामुळे हा पर्याय योग्य ठरु शकतो, हे सरकारकडून पडताळून पाहिले जात आहे.

मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून यामुळे शहर व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र, राज्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यानंतर कारशेड कांजूरमार्गला होणार असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने कडाडून टीका केली. तसेच हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने कांजूर येथील कामाला स्थगिती दिली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कारशेड कांजूरमार्गला होणार असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली. तसेच हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने कांजूर येथील कामाला स्थगिती दिली. परवाच पार पडलेल्या अधिवेशनातही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अहंकारातून मेट्रो कारशेडची जागा ही आरेतून कांजूरमार्गला वर्ग करण्यात आली, असा आरोप केला होता.

“विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अट्टाहास का आहे?,” असा सवालही फडणवीस यांनी केला होता. “मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे.” असेही त्यांनी म्हटले होते.

आता मेट्रो कारशेडसाठी बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेचा विचार होतो आहे अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते आहे. न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत कारशेड उभारण्यास विलंब लागू नये म्हणून ठाकरे सरकारकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरु केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या मुंबई – अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामास आधीच कोविड-१९ साथीच्या आजारामुळे उशीर झाला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. याच्या माध्यमातून देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात त्यांनी जपानला सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पासाठी ६३ टक्के जमीन अधिग्रहण करून ती ताब्यात घेतली आहे. यामध्ये गुजरातमधील सुमारे ७७ टक्के, दादरा नगर हवेलीमध्ये ८० टक्के आणि महाराष्ट्रातील २२ टक्के भूधारकांचा समावेश आहे. मात्र, अद्याप ९ निविदा उघडल्या गेलेल्या नसून महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी यासारख्या क्षेत्रात भूसंपादनासंदर्भात अजूनही काही अडचणी आहेत. अशावेळी वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर आता मेट्रो ३ ची कारशेड हलविण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे.

केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

मुंबई मेट्रो तीन कारशेडच्या जागेवरुन भाजप आणि महाविकास आघाडीत राजकारण रंगताना पाहायला मिळालं आहे. अशात बुलेट ट्रेन हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्री प्रोजेक्ट. मात्र, बुलेटसाठीची प्रस्तावित जागा राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता ती जागा केंद्राला दिली जावी की मेट्रो तीनच्या कारशेडसाठी वापरली जावी याबाबत विचार सुरु असल्याने पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी