28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईमुंबईत 22,483 कुटूंबे धोकादायक स्थितीत; 12 वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांवर उपाययोजना नाही

मुंबईत 22,483 कुटूंबे धोकादायक स्थितीत; 12 वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांवर उपाययोजना नाही

पावसाळ्यात मुंबईत अनेकदा आणिबाणीची स्थिती उद्भवते, अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना, इमारती कोसळ्याण्याच्या घटना समोर येतात. त्याच प्रमाणे मुंबईत दरडी कोसळण्याच्या घटना देखील गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहेत. असे असताना मागील 12 वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार उदासीन असल्याचे चित्र आहे. मागील 31 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 310 लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील 22 हजार 483 झोपड्यांपैकी 9 हजार 657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळयात भूस्खलनामुळे 327 ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.

सन 1992 ते 2023 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 310 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते.

हे सुद्धा वाचा 
कुपोषणाचा राक्षस पुन्हा जागा झाला; चार वर्षात राज्यात ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू

बोगस बियाणे, खताची तक्रार आता करता येणार व्हॉट्स ॲपवर

खारघर दुर्घटना: एक सदस्य समितीला मुदतवाढ; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मंडळाचा अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर 12 वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करीत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलीच नाही, असे गलगली म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी