30 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव; सुनावणीची तारीख आली समोर

मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव; सुनावणीची तारीख आली समोर

मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटले आहे. गेली काही दिवस आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. मात्र आता संयम सुटत चालल्याने मराठा समाजाने आणखी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटलांनी राज्यभर सभा घेत आंदोलने केली आहेत. सुरूवातीला अंतरवाली सराटी येथे उपोषण केले. यावेळी सरकारने ४० दिवसात तोडगा काढू असे आश्वासन मराठा समाजाला दिले होते. ४० दिवस होऊन गेले तरीही आरक्षणाबाबत कशात काही नाही. यामुळे आता जरांगेंनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे ८ दिवस झाले उपोषण केले आहे. दरम्यान, या उपोषणाला, आंदोलनाला आता वेगवेगळे वळण लागले. दरम्यान, आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
काही वर्षांआधी गुणरत्न सदावर्ते हे एसटी संपामुळे चर्चेत आले होते, तर आता मराठा आरक्षणामुळे ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाला सदावर्तेंचा पहिल्यापासून विरोध आहे. काही वृत्तमाध्यमातून सदावर्तेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे अनेकदा वक्तव्य केले आहे. मराठा समाज मागास नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यावरून सदावर्तेंच्या गाडीच्या काचा फोडल्या. तर मराठवाड्यातील आमदारांची घरे जाळण्यात आली होती. अशातच आता सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून सुनावणीची तारीख आता समोर आली आहे.
हे ही वाचा
सदावर्तेंची मुंबई हायकोर्टात धाव
राज्यातील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या आरक्षणावरून वातावरण गढूळ होऊ लागले आहे. दरम्यान वकिल गुणरत्न सदावर्तेंनी सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरून मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी ही येत्या ८ तारखेला होणार आहे. मराठा समाजाकडून आता कोण युक्तीवाद लढवणार? कोर्ट काय निकाल देणार? हे ८ तारखेला कळेल.
दरम्यान, मराठा समाजाने सरकारला कुणबी जातप्रमाणपत्राची मागणी केली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी मराठा समाजाने व्यक्त केली. मात्र सरकारने वंशजांच्या दाखल्याच्या नोंदी घेऊन मराठ्यांना कुणबीप्रवर्गात सामावून घेतले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकसकट मराठा समाजाला कोँणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सरकार म्हणत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी