28 C
Mumbai
Monday, June 17, 2024
HomeमुंबईNarendra Modi : PM मोदींचं 'संसदीय' कार्यालय चक्क OLX वर 7.5 कोटीमध्ये...

Narendra Modi : PM मोदींचं ‘संसदीय’ कार्यालय चक्क OLX वर 7.5 कोटीमध्ये विक्रीला, चौघे ताब्यात

टिम लय भारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कार्यालय काही कुरापतखोर लोकांनी चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कार्यालयाची किंमत साडेसात कोटी रुपये एवढी सांगण्यात आली आहे. दरम्यान ही जाहिरात टाकणा-या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी एकाला अटक केली आहे.

हा प्रकार समजताच पोलिसांनी संबंधित जाहिरात ओएलएक्सवरून हटवली. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकससभा मतदार संघातील भेलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरनगर एक्सटेंशनमध्ये हे कार्यालय सुुरू केले आहे. येथे स्थानिक नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. मोदी नियमितपणे आपल्या मतदारसंघातील जनतेच्या सपर्कात असतात. पंतप्रधानांच्या याच संसदीय कार्यालयाची छायाचित्रे घेऊन आरोपीनी ती वस्तूंची पुनर्विक्री करणारी साईट असलेल्या ओएलएक्सवर अपलोड केली. तसेच कार्यालयाची विक्रीसाठीची किंमत साडे सात कोटी एवढी सांगितली आहे. तसेच कार्यालयाच्या आतील सुविधा, खोल्या, पार्किंग यांचीही माहिती जाहिरातीमधून दिली आहे. तसेच जाहिरात टाकणा-या चौघांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एकाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी