28.2 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमुंबईकोरोना कोपला : विधानभवनात शुकशुकाट

कोरोना कोपला : विधानभवनात शुकशुकाट

टीम लय भारी

मुंबई : अधिवेशन काळामध्ये विधानभवन लोकांच्या गर्दीने गजबजलेले नेहमी पाहायला मिळते. पण गुरूवारपासून विधानभवनातील गर्दी झपाट्याने ओसरली आहे. विधीमंडळ परिसरात आमदार, मंत्री, पत्रकार व मोजके अधिकारी वगळता अन्य कुणालाही प्रवेश दिले जात नाहीत. त्यामुळे विधीमंडळातील गजबजाट पूर्णतः ओसरून गेला आहे.

राज्यात ‘कोरोना’चे 14 रूग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधानभवतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. विधीमंडळात प्रवेश करण्यासाठी नव्याने कोणालाही पासेस दिले जात नाहीत. राजकीय कार्यकर्ते, अधिकारी, व्हिआयपी अशा सगळ्यांनाच नवीन पासेस देणे बंद केले आहे. त्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांना विधीमंडळाच्या बाहेरच ताटकळत राहावे लागत आहे. एवढेच नव्हे तर, सभागृहात उपस्थित होणाऱ्या संभाव्य प्रश्नांबाबत ब्रिफिंग करण्यासाठी एक – दोन दिवसांसाठी मुंबईत आलेल्या राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही विधानभवनात प्रवेश दिले जात नाहीत. पूर्ण अधिवेशन कालावधीसाठी अगोदर पासेस घेतलेले अधिकारी, पत्रकार व अन्य व्हीआयपी मंडळींनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विधानभवनातील गर्दी ओसरली आहे.

नवे सरकार सत्तेवर आल्यापासून गेली तीन महिने प्रत्येक मंत्र्यांभोवती सामान्य जनता व कार्यकर्त्यांचा मोठा गराडा पडलेला दिसत होता. पण विधानभवनातील गर्दी ओसरल्याने मंत्र्यांच्या भोवती चीटपाखरूही नाही असे चित्र दिसू लागले आहे. मंत्र्यांच्या दालनातही तुरळक गर्दी दिसत असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

राज्यात कोरोना बाधितांची संख्या १४, राजेश टोपे यांची माहिती

राज्य सरकारच्या ‘अभ्यासू’ अधिकाऱ्याला मुंबई विद्यापीठात सन्मानाचे स्थान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी